प्राजक्त तनपुरे म्हणाले, पुन्हा येण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवा

राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
Mahavikas Aghadi Andolan
Mahavikas Aghadi AndolanDatta Ingale
Published on
Updated on

अहमदनगर - महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) अटक केली. या अटके विरोधात महाविकास आघाडी तर्फे अहमदनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ( Instead of dreaming of coming back, go to the people and solve their problems )

या आंदोलनाला सकाळी 11 वाजता सुरवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. या आंदोलनात शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, संग्राम जगताप, नीलेश लंके, आमदार सुधीर तांबे, उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, घनश्याम शेलार, अभिजित खोसे, काँग्रेसचे प्रदेश सहसचिव दीप चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, संदीप गुंड आदी उपस्थित होते.

Mahavikas Aghadi Andolan
डाॅ. लहामटे का म्हणाले, मी पळकुटा आमदार नाही

प्राजक्त तनपुरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरात भाजप नेत्यांचे उपोषण झाले होते. त्यावेळी मी माहिती घेतली की तेथील उपोषण कर्ते हे थोडेफार राहिलेले भाजपचे आमदार, काही माजी आमदार असतील त्यांनी शेतकरी व शेती पंप विषयावर उपोषण केले. त्यावेळी मी आमरण असे नाव ऐकले होते. उपोषण सुरू झाल्यावर दोन तासांनी आढावा घेतला. मंडप टाकून भाजपचे आमदार व माजी आमदार छान सावलीत बसले होते. दोन तासात उपोषण संपलंही. महाविकास आघाडीचे मी कौतूक करेल कारण आजच्या आंदोलनात आम्ही आमदार व नेते उन्हात आहोत. आणि आमच्या महिला आघाडीच्या नेत्यांना सावलीत बसविले आहे. हे आमचे संस्कार आहेत.

तनपुरे पुढे म्हणाले की, आम्ही पाच आमदार पहिल्यांदाच विधानसभेत गेलो. आम्ही नवीनच होतो विधानसभेत. तिथे गेल्यापासून आम्ही पाहतो आहोत की, विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून जे काम व्हायला पाहिजे ते काम न होता. पहिल्या दिवसा पासून आरडाओरडा सुरू आहे. सुरवातीला आम्हालाही काही कळेना. विरोधी पक्षांनी जनतेचे विधायक प्रश्ने मांडले पाहिजेत. शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडायचे सोडून फक्त गोंधळ घालण्याचे काम त्यांनी विधानसभेत केले. मागील वर्षी विधानसभेत माईकची तोडफोड केली. गचंडी धरण्यापर्यंत मजल जाईल असा त्यांचा आविर्भाव होता. कुठल्याही प्रकारे सत्ता मिळवायची अशा पद्धतीने मागील दोन वर्षांपासून भाजपचे काम सुरू आहे.

Mahavikas Aghadi Andolan
प्राजक्त तनपुरे म्हणाले, माझ्यावर इडी संदर्भात टीका करणाऱ्याला माझं नावच कसं घेता आलं...

महाविकास आघाडीचे सरकार मागील दोन वर्षांपासून कामकाज करत आहे. यात दुर्दैवाने कोरोनासारख्या मोठ्या संकटाशी सामना आपल्याला करावा लागला. पहिला निर्णय कर्जमाफी घेतला. त्याच्या कर्जमाफी सारखे बायकोला आणा याला आणा त्याला आणा असे केले नाही. कोरोना संकटामुळे काम करण्यावर थोडी मर्यादा आली. तरीही महाविकास आघाडीने कोरोना संकटावर चांगल्या पद्धतीने मात करण्याचा प्रयत्न केला.

विरोधीपक्षाचे काम काय असावे? सरकारचे चुकीचे मुद्दे विरोधी पक्षाने समोर आणून मांडले पाहिजे. विरोधीपक्ष म्हणून सभागृहनेत्यांनी हे काम केले पाहिजे. आणि राज्याला केंद्राकडून ज्या-ज्या गोष्टींची गरज आहे. त्या गोष्टी केंद्राकडे जाऊन त्यांनी आणल्या पाहिजेत. मात्र तसे काही होत नाही. यांनी केंद्रात जाऊन महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे मागायला पाहिजेत.

Mahavikas Aghadi Andolan
प्राजक्त तनपुरे म्हणाले, कुटील डाव तुमच्यावरच उलटवू...

मी राज्यात मंत्री म्हणून फिरत असतो. या दौऱ्यांत माझ्या एक लक्षात आले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022पर्यंत सर्वांना घरे देण्याची मोठी योजना काढली होती. गोरगरिब नागरिकांना लोकांकडून उसणे पैसे घेऊन, कर्ज काढून घरकुले बांधली. तरी केंद्राच्या योजनेतून एक रुपयाही मिळाला नाही. भाजपच्या लोकांनी केंद्रात जाऊन हे पैसे आणायला पाहिजेत.

सुरत-हैद्राबाद महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे. यात कौडीमोल किमतीने शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. भाजपच्या लोकांनी केंद्रात जाऊन या शेतकऱ्यांना जास्त पैसे द्या असे सांगितले पाहिजे. मात्र हे करायचे नाही आणि आमच्या चुघल्या करायच्या. याला आता टाका त्याला आत टाका. याचा इकडे व्यवहार आहे तिकडे व्यवहार आहे असे सांगून ईडी सारख्या यंत्रणा मागे लावून द्यायच्या. त्यांनी विरोधी पक्षात आहोत हे स्वीकारले पाहिजे. तुम्ही जरी 105 असले तरी राज्याती जनतेने तुम्हाला विरोधी पक्षात नेले आहे. विरोधी पक्षाची भूमिका भाजपने योग्य प्रकारे साकारली तर ज्यांना पुन्हा यायच असे वाटते. पुन्हा येण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवा. नुसत्या आमच्या चौकशी लावून हे होणार नाही. तुम्हाला खरचं पुन्हा यायच असेल तर लोकांत जा. केंद्र सरकारकडून लोकांच्या ज्या अडचणी आहेत. त्या त्यांनी सोडवायला पाहिजे. तर कदाचित लोक स्वतःहून तुम्हाला पुन्हा आणतील, अशी कोपरखळीही त्यांनी नाव न घेता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मारली.

Mahavikas Aghadi Andolan
राजेंद्र फाळके म्हणाले, प्रताप ढाकणे षटकार मारणार...

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर असेच खोटे आरोप झाले. पुढे त्यांच्यावर आरोप करणारेच दिसत नाहीत. नवाब मलिक यांच्या बाबत 1992-93 सालातील विषय काढला आहे. 1998मध्ये अटल बिहारी वाजपेय यांचे 13 महिन्यांचे सरकार होते. पुन्हा तुमचे सरकार पाच वर्षे केंद्रात होते. 2014 नंतर तुमचे अच्छे दिन आले. म्हणजे जवळपास 15 वर्षे तुमचे सरकार होते. त्यावेळी तुम्हाला का दहशतवाद दाऊत का नाही आठवला. जेव्हा नबाव मलिक भाजपवर बोलायला लागले. भाजपच्या खोट्या गोष्टी उघडकीस आणू लागले. त्यामुळे त्यांना अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील जनतेला भाजपची सोंगे कळू लागली आहेत. ते म्हणत असले पुन्हा येईन तरी तसे काही होणार नाही.

Mahavikas Aghadi Andolan
आशुतोष काळे म्हणाले, शरद पवार पंतप्रधान व्हावेत...

आम्ही ठरल तर...

आम्हीही त्यांच्या सारखं करू शकतो. आम्ही मनामध्ये आणलं तर या अहमदनगर जिल्यातील भाजपच्या माजी आमदार 'त्याच्यामध्ये तिकडे दिसतील' मात्र आम्हाला लोक विचारतात, तुम्ही असे का करत नाहीत. महाविकास आघाडीचा आमदार सकाळी सात पासून रात्री 11 वाजेपर्यंत लोकांत असतो. त्यांचे प्रश्न सोडवितो. लोकांच्या प्रश्न सोडविण्याचे काम आमचा प्रत्येक आमदार करतो. त्यांच्या सारखा आम्हाला वेळ मिळत नाही. खोटे गुन्हा दाखल करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही करतो. त्यामुळे आम्ही त्या बाबत कमी पडलो. मात्र वेळ आली तर 12 मतदार संघातील प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम लावू शकतो मात्र जनतेने आम्हाला याच्यासाठी निवडून दिलेले नाही, असे म्हणत मंत्री तनपुरे यांनी नाव न घेता भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका केली.

Mahavikas Aghadi Andolan
नीलेश लंके म्हणाले, मी पाकिस्तानातून आलोय का ?

ऊर्जा विभागाला अडचणीत आणत आहेत

राज्यातील ऊर्जा विभागाला केंद्र सरकार अडचणीत आणू पाहत आहे. लोकांना फक्त दिसते ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे वीज जोडणी तोडतात मात्र त्यांची कारस्थाने चालू आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी बँकांना पत्र दिले आहे की, राज्यातील ऊर्जा कंपन्यांना कर्ज देऊ नका. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी याच्यावर कारवाई करा. त्याच्यावर कारवाई करा असे सांगण्यापेक्षा केंद्राने राज्याला मत करावी असे सांगत नाहीत. कोणी घाबरण्याचे कारण नाही. मलाही ईडीने बोलावले होते. मीही जाऊन आलो. काही दिवसांनी असे होईल की नागरिक नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घाबरेल मात्र ईडीला घाबरणार नाही, अशी त्यांनी ईडीची अवस्था केली आहे, अशा टोलाही त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना नाव न घेता लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com