Solapur Water Issue : सोलापूरच्या पाणीप्रश्नाला नेत्यांबरोबरच जनताही तेवढीच दोषी; आंबेडकरांनी साधला निशाणा

Prakash Ambedkar News : सोलापूर आणि पुण्यात जास्त साम्य आहे. या दोन्ही जिल्ह्यात भरपूर मंत्रिपद घेतली आहेत आणि पाणीही. ब्रिटिश आणि यशवंतराव चव्हाण यांच्या काळात पाण्याचं नियोजन झालं. मात्र, त्यानंतर काही नाही झालं.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 November : सोलापूर शहरला 9 दिवस पाण्यासाठी वाट बघायची गरज नाही. मात्र, आजही 7 दिवस पाण्याची वाट पाहावी लागत आहे. हा दोष लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये आणि दुसरा दोष इथल्या मतदारांमध्ये आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरच्या पाणीप्रश्नाला येथील जनतेलाच जबाबदार धरले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर हे आज (ता. ०९ नोव्हेंबर) सोलापुरात आले होते. सभेपूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी सोलापूरच्या (Solapur) पाणीप्रश्नावर भाष्य केले आहे. त्या वेळी त्यांनी लोकप्रतिनिधी आणि जनताच येथील पाणीप्रश्नाचे कारण असल्याचे सांगितले.

ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, माझी तब्येत आता चांगली आहे आणि डॉक्टरांनी परवानगी दिलेली आहे. दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर माझी पहिली सभा सोलापुरात होत आहे. सोलापूर आणि पुण्यात जास्त साम्य आहे. या दोन्ही जिल्ह्यात भरपूर मंत्रिपद घेतली आहेत आणि पाणीही. ब्रिटिश आणि यशवंतराव चव्हाण यांच्या काळात पाण्याचं नियोजन झालं. मात्र, त्यानंतर काही नाही झालं.

Prakash Ambedkar
Solapur DCC Bank Scam : दिलीप सोपलांकडे सर्वाधिक 30 कोटींची जबाबदारी; कोणत्या नेत्याकडे किती रक्कम पाहा...

सोलापूर शहरातून 450 कोटी रुपये हा प्रॉपर्टी टॅक्स जमा केला जातो. महानगर पालिकेच्या जवळपास 250 बसेस सडत पडलेल्या आहेत. त्यामुळे शहराकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे. अलमट्टी धरणातील पाणी आपण 110 फुटावर भरू देत नाही. सुमारे 80 ते 90 पर्यंत ठेवा, अशी विनंती कर्नाटक सरकारला करतो, कारण पातळी वाढली तर संपूर्ण सांगली शहर पाण्याखाली जाऊ शकतं, असंही त्यांनी सांगितले.

सोलापूर, सांगली आणि धाराशिवच्या दुष्काळी भागात पाणी वळवण्याची सोय आहे. मात्र, त्याचं नियोजन करण्याची गरज आहे. इथल्या मतदाराला दुष्काळ आणि बिनापाण्यामध्ये कसं भागत असेल, असा मला प्रश्न पडतो. कोरडा आणि ओल्या दुष्काळापासून वंचित बहुजन आघाडी या भागाची सुटका करू शकते. पाण्याचा प्रश्न सुटला तर लाडकी बहीण योजना आणण्याची गरज पडणार नाही, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

Prakash Ambedkar
Manoj Jarange Patil : जरांगेंनी निवडणुकीतून माघार का घेतली? प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा गौप्यस्फोट...

ते म्हणाले, सोलापूर हे एक टेक्सटाईल हब आहे, त्यामुळे सोलापुरात इंपोर्ट-एक्सपोर्टचं कार्यालय असायला पाहिजे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही मराठी माणसाला जगभरात मान्यता आहे आणि त्याच्या सांस्कृतिक आयुष्याला स्वीकारण्याचा भाग आहे, असे मांडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com