
Pune News : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांनी पर्यटकांना धर्म विचारून नंतर गोळ्या मारल्याचे समोर आले आहे. यानंतर दोन धर्मामध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या कश्मीरमधील विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा पुरवावी, अशी मागणी पुणे पोलिसांकडे केली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सरहद संस्थेच्या माध्यमातून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना एक पत्र देण्यात आला आहे. या पत्रामध्ये पुण्यामधील कश्मीरी विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरहद ही संस्था गेली 30 वर्ष जम्मू आणि काश्मीरमधील विद्यार्थी आणि महिलांच्या पुर्नवसनासाठी काम करणारी देशातील अग्रगण्य संस्था आहे.
संस्थेचे अनेक प्रकल्प काश्मीरमध्ये सुरू आहेत. तर पुण्यात जम्मू काश्मीरमधील बहुसंख्य विद्यार्थी व युवक संस्थेशी जोडले गेले आहेत. गेली काही महिने काश्मिरींना टारगेट करण्याच्या काही घटना घडत आहेत. पैकी ऑक्टोंबर 2024 मध्ये दोन गंभीर प्रसंगात भारती विद्यापीठ पोलिसांनी मदत केल्याने काही काश्मिरी मुलांचे प्राण वाचले होते.
मात्र पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टीसाठी काश्मीरला गेलेले आणि येथे परतलेले काश्मिरी विद्यार्थी महाराष्ट्रातील तसेच इतर भागातील पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. मात्र पुण्यासह महाराष्ट्रामध्ये कालपासून समाज माध्यमांबरोबरच इतर माध्यमातून काश्मिरींना धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत काही तक्रारी आल्याचं सरहद संस्थेनं सांगितलं आहे.
तर सध्याचे वातावरण पाहता काश्मिरी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालून त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच यासाठी समन्वयक म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली आहे.
कश्मीर विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याबाबत करण्यात आलेल्या मागणी विषयी प्रकाश आंबेडकर यांना विचारला असता आंबेडकर म्हणाले, राईट विंग संघटनांना, सर संघचालक मोहन भागवत यांनी कंट्रोल करावं. कारण मोहन भागवतांचीच ही सर्व अंडी पिळावळ आहेत. त्यांनी त्यांच्या संघटनांना आणि त्यांच्या निगडित लोकांना जम्मू कश्मीर मधील विद्यार्थ्यांवर अटॅक होणार नाही, याबाबतचे आदेश काढावेत असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.