BJP politics : स्थापनादिनीच पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; एकाच शहरात भाजपची 2 स्वतंत्र कार्यालयं

BJP internal conflict Ichalkaranji : नव्याने स्थापन झालेल्या कार्यालयात माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्ह्यातील कोणत्याच नेत्याला स्थान दिलेलं नाही. समोर लावण्यात आलेल्या फलकावर देखील जिल्ह्यातील एकाही नेत्याचा फोटो किंवा उल्लेख नाही. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हळवणकर हे देखील या फलकावर नाहीत.
BJP internal conflict Ichalkaranji
BJP internal conflict IchalkaranjiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 06 Apr : मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांचा भाजप प्रवेश करत आणि निष्ठावंत भाजप नेते माजी आमदार सुरेश हळवणकर त्यांना थांबवत पुत्र राहुल आवाडेंना उमेदवारी देण्यात आली होती.

अशातच आता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे कार्यालय असताना भाजपचे स्वतंत्रपणे वेगळे कार्यालय थाटत अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे. एकाच शहरात भाजपचे (BJP) दोन कार्यालय स्थापन झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इचलकरंजी भाजप कार्यालयात पाय ठेवला आहे की नाही? हा संशोधनाचा विषय आहे. तर स्वतंत्रपणे कार्यालय करत हळवणकर गटालाच ठेंगा दिल्याचा प्रयत्न असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

नव्याने स्थापन झालेल्या कार्यालयात माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्ह्यातील कोणत्याच नेत्याला स्थान दिलेलं नाही. समोर लावण्यात आलेल्या फलकावर देखील जिल्ह्यातील एकाही नेत्याचा फोटो किंवा उल्लेख नाही. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हळवणकर हे देखील या फलकावर नाहीत.

BJP internal conflict Ichalkaranji
Dinanath Hospital : "शरद पवारांनी रुग्णालयाला दिलेली जागा मंगेशकर ट्रस्टने संघाच्या लोकांना दिली अन्..."; पुण्यातील बड्या नेत्याचा धक्कादायक दावा

माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी हे फोटो समाज माध्यमात व्हायरल केल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वादाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. भाजपच्या स्थापनादिनी माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. विशेष म्हणजे इचलकरंजी शहरात भाजप कार्यालय असताना आवाडे यांनी स्वतंत्रपणे भाजप कार्यालय सुरू केले आहे.

इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत दिलजमाई झालेले माजी आमदार सुरेश हळवणकर यांना देखील या फलकावरून वगळण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर प्रमुख नेत्यांना देखील या फलकावर स्थान देण्यात आलेले नाही. केवळ जिल्ह्यात आपलीच राजकीय प्रस्त वाढवण्यासाठी आवाडे यांनी आपली खेळी सुरू केल्याचं बोललं जात आहे.

BJP internal conflict Ichalkaranji
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट रखडणार; राज्य सरकारचा घरचा आहेर!

नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाजप कार्यालयाच्या डिजिटल फलकावर डिजिटल बोर्डावर जिल्ह्यातील नेते गायब आहेत. माजी आमदार सुरेश हाळवणकर, खासदार धनंजय महाडिक बोर्डावरून गायब आहेत. डिजिटल बोर्डावर माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा फोटो नसल्यामुळे हळवणकर गटाचे कार्यकर्ते नाराज झालेत.

विधानसभा निवडणुकीत आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यात दिलजमाई करत या जागेवर विजय मिळवला होता. तेच नव्हे तर हळवणकरांनी कार्यकर्त्यांचा रोष अंगावर घेत आवाडे यांनी मदत केली होती. आवाडे यांच्यासाठी कॉम्प्रमाईज केलेल्या हळवणकरांना मात्र आवाडे यांनी ठेंगा दाखवायला चालू केला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com