Dinanath Hospital : "शरद पवारांनी रुग्णालयाला दिलेली जागा मंगेशकर ट्रस्टने संघाच्या लोकांना दिली अन्..."; पुण्यातील बड्या नेत्याचा धक्कादायक दावा

Dinanath Mangeshkar mismanagement : "रुग्णालयातील स्टाफ, नर्स, डॉक्टर चांगले आहेत. मात्र, मॅनेजमेंटने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संपूर्ण व्यापारीकरण करून ठेवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिम्मत असेल तर संघाशी संबंधित एकातरी संचालकाला अटक करून दाखवावी."
Dinanath Hospital, Sharad Pawar
Dinanath Hospital, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 06 Apr : पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये (Dinanath Hospital) उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'आरएसएस'शी संबंधित असलेल्या या रुग्णालयातील संचालकांवर कारवाई करणार नाहीत, असा आरोप पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी केला आहे.

शांतीलाल सुरतवाला म्हणाले, "दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जागा आमचे नेते शरद पवार यांनी या रुग्णालयाला दिली आहे. मात्र दीनानाथ मंगेशकर ट्रस्टने ही जागा आरएसएसशी संबंधित असलेल्या लोकांना बहाल केली. महाराष्ट्र सरकारने दिलेली जागा इतरांना देण्याचा अधिकार कोणालाही नसतो, आम्हाला कायदा माहिती आहे.

या जागेत चाललेले गैर व्यवहार लोकांना कळले पाहिजेत. या ठिकाणी माझं देखील ऑपरेशन झालं आहे. केमोच्या आठ थेरपी त्या ठिकाणी मी घेतल्या आहेत. पुणे शहराचा महापौर असताना देखील सकाळी आठ वाजता त्या ठिकाणी रूम मिळवण्यासाठी मी रांगेत उभा राहिलो आहे. अख्या जगात दीनानाथ मंगेशकर हे एकच हॉस्पिटल आहे.

Dinanath Hospital, Sharad Pawar
BJP office : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसवर हल्ला; कर्मचाऱ्यावर तलवारीने वार, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

ज्या ठिकाणी दोन दिवस किंवा तीन दिवस आधी रूम बुक केल्या जात नाहीत. भिकाऱ्यासारखं हॉस्पिटलच्या रांगेमध्ये उभं राहावं लागतं. ग्रामीण भागातील शेतकरी पहाटे पाच साडेपाच वाजता पोराबाळांसह भिकाऱ्यासारखा त्या ठिकाणी येऊन बसलेला असतो. डॉक्टर त्याचे पैसे घेतो. मात्र इतर सर्व पैसे मॅनेजमेंटकडून वसूल केले जातात.

रुग्णालयातील स्टाफ, नर्स, डॉक्टर चांगले आहेत. मात्र, मॅनेजमेंटने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संपूर्ण व्यापारीकरण करून ठेवलं आहे, असा दावा त्यांनी केला. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर संघाशी संबंधित एकातरी संचालकाला अटक करून दाखवावी. मी पाच लाख रुपयांची देणगी गोळा करून ससून रुग्णालयाला देईन, असं आव्हानंच शांतीलाल सुरतवाला यांनी दिलं आहे.

Dinanath Hospital, Sharad Pawar
Shivendraraje Bhosale : "जूननंतर कामांचा पाऊस पाडणार..."; मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं 'त्या' आमदारांना आश्वासन

मात्र, त्या रुग्णालय प्रशासनावर कोणी कारवाई करणार नाही. ते फक्त बोलबच्चन आहेत. हिंदूंनी हिंदूंना मारलं आहे. ज्या माऊलीच निधन झालं ती देखील हिंदू होती. त्यामुळे हिंदूंनी हिंदूंना मारायचं आणि औरंगजेबाचा विषय चर्चेला आणायचा असलं राजकारण हाणून पाडणं आवश्यक आहे. यावेळेस मुख्यमंत्र्यांना या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी एक महिन्याचा अवधी द्यावा आणि जर त्यांनी कारवाई नाही केली तर त्यांना घरी बसवावं, असं देखील ते यावेळी म्हणाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com