Satara News : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा करीत दोन वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्पाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 8 मार्च 2024 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. ग्रामीण भागात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून मुनावळे येथे हा प्रकल्प विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, आता हे काम थांबवण्याचे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्पाचे काम सुरु होते. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर 16 परवानग्या मिळाल्या नसल्याने मुनावळे येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम सुरु करता येणार नाही, असे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत.
केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने मुनावळे हे ठिकाण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी इकोसिन्सिव्ह झोन म्हणून जाहीर केला आहे. या ठिकाणी कोणतेही पर्यटन प्रकल्प राबवताना वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्यजीव मंडळ, राज्य वन्यजीव मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोयना जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत या प्राधिकरणांच्या 16 ना-हरकत परवानग्या मिळवणे गरजेचे असताना सद्य:स्थितीत कोणत्याही विभागाची परवानगी मिळाली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे न हरकत प्रमाणपत्र प्राप्त होणे गरजेचे होते.
या सर्व विभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्याशिवाय पर्यटन प्रकल्पातील कामे सुरू करू नये, असे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोयना धरणातील शिवसागर जलाशयात मुनावळे येथे जलपर्यटनाच्या प्रकल्पाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरु करण्यात आला होता. गोड्या पाण्यातील हा देशातला पहिलाच जल पर्यटन प्रकल्प आहे. याच्या उदघाटनावेळी एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पामुळं स्थानिकांना फायदा होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले होते.
या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार उपल्बध होणार होता. त्यामुळे या भागातून कामासाठी शहराकडे स्थलांतरित झालेले नागरिक या प्रकल्पामुळे परत येईल, असे सांगितले जात होते. त्यासोबतच महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या पर्यटकांना आता याचा दुहेरी लाभ होईल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यामुळे आता या प्रकल्पाचे काम थांबविण्यास सांगितले असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.