Phaltan Politic's : निष्ठावंत नेत्याने सोडली रामराजेंची साथ; जयकुमार गोरे, रणजितसिंह निंबाळकरांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश

Pramod Nimbalkar Join BJP : फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर गटातील एका नेत्याने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.
Pramod Nimbalkar
Pramod NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Satara, 03 August : फलटण नगरपरिषदेत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सत्तेला सुरूंग लावलेल्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पुन्हा एकदा राजे गटाला जोरदार धक्का दिला आहे. फलटण शहरातील ताकद वाढविण्याच्या उद्देशाने रामराजे गटाचे कट्टर समर्थकाला रणजितसिंहांनी गळाला लावले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत रामराजेंची साथ सोडणाऱ्या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी फलटण शहराध्यक्ष आणि माळजाई उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी आपल्या समर्थकांसह माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नेतृत्व मान्य करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमोद निंबाळकर यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे प्रमोद निंबाळकर यांच्या पक्ष प्रवेशासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

Pramod Nimbalkar
Ashadi Wari : मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना विठ्ठल मंदिरात धक्काबुक्की; मंदिर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

प्रमोद निंबाळकर हे राजे गटाचे कट्टर समर्थक मानले जातात. यापूर्वी त्यांनी फलटण पालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे संस्थापक अध्यक्ष, तसेच लायन्स क्लबचे सचिव म्हणून कार्य केले आहे. राजकीय क्षेत्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीसपद यशस्वीपणे सांभाळले आहे.

Pramod Nimbalkar
Phaltan News : फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरला धक्काबुक्की; माजी मंत्र्याच्या ‘ओएसडी’सह दोघांवर गुन्हा

फलटण शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सहकार्याने शहराच्या विकासकामांना अधिक गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रमोद निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com