

Pandharpur, 03 August : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या आषाढी एकादशीच्या महापूजेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की झाली होती. त्या प्रकरणी संबंधितांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मंदिर व्यवस्थापनाला दिले आहेत. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी 15 दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे अतिमहत्वाच्या व्यक्तीला धक्काबुक्की करणाऱ्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते सपत्नीक झाली. महापूजेवेळी त्यांच्या समवेत अति महत्त्वाच्या काही व्यक्ती उपस्थित होत्या. या महत्त्वाच्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश देत असताना काही कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याची नोटीस दिली.
त्या अनुषंगाने मंदिर समिती व्यवस्थापनाकडून संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये बीव्हीजी कंपनीचे प्रमुख, सुरक्षा विभाग प्रमुख चंद्रकांत कोळी, सुरक्षा कर्मचारी गोवर्धन बोंबाळे, सुरेश पाटील, लिपिक आनंद नागटिळक, रमेश गोडसे, प्रकाश पाटील, सुरज तेली आणि सुधाकर घोडके यांचा समावेश असून, त्यांना लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
कारवाईकडे लक्ष
दरम्यान मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके हे रजेवर आहेत, त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ मागितल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे यांनी दिली. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.