Mangalvedha Congress : प्रणिती शिंदेंची नाराजी भोवली; काँग्रेसमधील पदावरून तडकाफडकी उचलबांगडी!

Solapur Political News : शहराध्यक्ष राजाभाऊ चळेकर यांना प्रणिती शिंंदे यांनी जाहीरपणे लोकसभा निवडणुकीच्या कामाबाबत जाहीरपणे फटकारले होते. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुठे दिसला नाहीत, तुम्ही कुठे होता, अशी विचारणा प्रणिती शिंदे यांनी राजाभाऊ चळेकर यांना केली होती.
Ad Rahul Ghule
Ad Rahul GhuleSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 27 January : खासदार प्रणिती शिंदे यांची नाराजी आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणे, मंगळवेढा शहराध्यक्ष राजाभाऊ चळेकर यांना चांगलेच भोवले आहे. चळेकर यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काँग्रेस पक्षात आलेले ॲड राहुल घुले यांच्याकडे मंगळवेढा शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) सोलापूर लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या पुनर्बांधणीस सुरुवात केली आहे. त्यातून काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी पुढाकारातून ॲड घुले यांच्याकडे मंगळवेढा शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार शिंदे यांच्या हस्ते घुले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत मंगळवेढ्यातून (Mangalvedha) काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मताधिक्क्य मिळाले होते. मात्र, शहराध्यक्ष राजाभाऊ चळेकर यांना प्रणिती शिंंदे यांनी जाहीरपणे लोकसभा निवडणुकीच्या कामाबाबत जाहीरपणे फटकारले होते. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुठे दिसला नाहीत, तुम्ही कुठे होता, अशी विचारणा प्रणिती शिंदे यांनी राजाभाऊ चळेकर यांना केली होती. लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या प्रचारातील सहभागाबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी सवाल उपस्थित केले होते.

Ad Rahul Ghule
Vidarbha Politic's : नाना पटोलेंनी प्रफुल पटेलांना पुन्हा दिला धोबीपछाड; भंडारा zp घेतली ताब्यात...

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ चळेकर यांनी थेट काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतली होती. पंढरपूरमधून काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष या नात्याने राजाभाऊ चळेकर यांनी भालके यांचा प्रचार करणे अपेक्षित होते. मात्र, चळेकर यांनी भालके यांचा प्रचार करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल सावंत यांचा प्रचार केला होता, त्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

ॲड राहुल घुले यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यावर आता मंगळवेढा शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ॲड राहुल घुले यांना काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.

Ad Rahul Ghule
Sharad Pawar : उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; केली ‘ही’ विनंती...

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन नगरपालिका निवडणुकीसाठी आक्रमक ॲड घुले यांना संधी देण्यात आली आहे. सध्या मरगळलेल्या काँग्रेस पक्षाला नवा चेहरा मिळाल्याने त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला होऊ शकतो. मात्र, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या ॲड घुले यांना संधी दिल्याने मूळचे नाराज होणार नाहीत, याची दक्षता काँग्रेस पक्षाला घ्यावी लागणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com