Solapur Loksabha Constituency : प्रणिती शिंदेंचे आरोप शहिदांचे अपमान करणारे; राम सातपुते यांचे प्रत्युत्तर

Loksabha Election 2024 : निवडणुका येतील जातील. मात्र, ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात. ही विकृत मानसिकता आहे, ही मानसिकता ठेचली पाहिजे, सोलापूरकर ही मानसिकता याच मातीत आगामी काळात गाडतील. सोलापूरकर देशाशी गद्दारी कधीही सहन करणारे नाहीत.
Praniti Shinde-Ram Satpute
Praniti Shinde-Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 March : पुलावमा हल्ला पाकिस्तानने केला होता, त्यामध्ये भारताचे जवान शहीद झाले. आमदार प्रणिती शिंदे यांनी जे आरोप केले आहेत, ते देशातील शहिदांचा अपमान करणारे आहेत. या देशासाठी ज्यांनी रक्त सांडले, त्यांचा हा अपमान आहे. निवडणुका येतील जातील. मात्र, ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात. ही विकृत मानसिकता आहे, ही मानसिकता ठेचली पाहिजे, सोलापूरकर ही मानसिकता याच मातीत आगामी काळात गाडतील. सोलापूरकर देशाशी गद्दारी कधीही सहन करणारे नाहीत, असे प्रत्युत्तर आमदार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिले.

सोलापूर लोकसभेच्या (Solapur Loksabha Constituency) काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर पुलवामा हल्ल्यावरून टीका केली होती. जेव्हा भाजपकडे काही मुद्दे नसतात, तेव्हा ते काहीतरी घडवतात. मागील निवडणुकीवेळी पुलवामा घडवले, असा आरोप शिंदे यांनी केला होता. त्याला भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी ही एक देशभक्त पार्टी आहे, त्यामुळे भाजप अशा विषयांमध्ये राजकारण करत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde-Ram Satpute
Dilip Mane Join Congress : माजी आमदार माने 5 वर्षांनंतर स्वगृही परतले; प्रणिती शिंदेंना मिळणार मोठे पाठबळ!

सुशीलकुमार शिंदे हे ज्यावेळी देशाचे गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी अतिरेक्यांचे तुष्टीकरण केले. पोटामध्ये ज्यांच्यावर आरोप होते, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने ज्यांच्यावर आरोप केले होते, अशा अनेक आरोपींना सोडून देण्याचे काम त्यांनी केले आहे. तुष्टीकरणाच्या नावाखाली त्यांनी कायम देशाशी गद्दारी केली आहे, त्याचा हिशेब त्यांना आता द्यावा लागेल. येत्या काळात आम्ही त्यांना याबाबतचा हिशेब मागणार आहोत, ज्यांना सोडलं त्यांची यादीही दाखवणार आहोत, असेही सातपुते म्हणाले.

आमदार राम सातपुते म्हणाले, काँग्रेस उमेदवाराची मानसिकताच तुष्टीकरणाची आहे. तुष्टीकरण करायचे आणि प्रसंगी देशाशी गद्दारी करायची, ही त्यांची मानसिकता आहे. ही निवडणूक मी सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे, सोलापूरचा चोहोबाजूने विकास झाला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.

Praniti Shinde-Ram Satpute
Danve Meet Khaire : अंबादास दानवेंनी खैरेंची गळाभेट घेत पेढा भरवला अन् संशयाचे धुके दूर केले...

काँग्रेसचे नेते सध्या प्रचाराला ज्या रस्त्याने अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूरला गेले आहेत, ते रस्तेदेखील भाजपने तयार केले आहेत. येत्या जुलै महिन्यात सोलापूरचे विमानतळ सुरू होतं आहे. काँग्रेसच्या नेत्यांना माझं आव्हान आहे की, तुम्ही धर्माला विरोध करता पण मोदींच्या प्रयत्नाने सुरु होणाऱ्या विमानतळमधून तुम्ही प्रवास कराल.

Edited By : Vijay Dudhale

Praniti Shinde-Ram Satpute
Latur Lok Sabha Constituency : लातुरात भाजपच्या हॅट्‌ट्रीकसाठी फडणवीसांचा निलंगेकरांवरच विश्वास, दिली मोठी जबाबदारी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com