Danve Meet Khaire : अंबादास दानवेंनी खैरेंची गळाभेट घेत पेढा भरवला अन् संशयाचे धुके दूर केले...

Shivsena Leader News : लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीतही अशीच नाराजी आणि त्यानंतर गळाभेट, तोंड गोड करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर लागलेला निकालही संभाजीनगरकरांनी पाहिला. त्यामुळे यावेळच्या गळाभेटीतून गेल्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टळेल, अशी अपेक्षा सामान्य शिवसैनिक बाळगून आहेत
Ambadas Danve-Chandrakant Khaire
Ambadas Danve-Chandrakant KhaireSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar, 31 March : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज खैरे यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. उमेदवारीबद्दल पुष्पगुच्छ देत आणि पेढा भरवत अभिनंदनही केले. या वेळी एकमेकांनी गळाभेट घेत नाराजीनाट्यावर पडदा टाकला.

दरम्यान, लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीतही अशीच नाराजी आणि त्यानंतर गळाभेट, तोंड गोड करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर लागलेला निकालही संभाजीनगरकरांनी (Chhatrapati Sambhajinagar) पाहिला. त्यामुळे यावेळच्या गळाभेटीतून गेल्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टळेल, अशी अपेक्षा सामान्य शिवसैनिक बाळगून आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ambadas Danve-Chandrakant Khaire
Latur Lok Sabha Constituency : लातुरात भाजपच्या हॅट्‌ट्रीकसाठी फडणवीसांचा निलंगेकरांवरच विश्वास, दिली मोठी जबाबदारी...

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास अंबादास दानवे (Ambadas Danve ) इच्छूक होते, तशी मागणीही त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. परंतु गेल्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या झालेल्या पराभवाची कारणे, पार्श्वभूमी पाहता ठाकरेंनी पुन्हा एकदा खैरेंना संधी देण्याचा निर्णय घेतला. यामागे जिल्ह्यातील शिवसैनिकांची मर्जीही होती. सहाजिकच या निर्णयाने अंबादास दानवे दुखावले, त्यांनी माध्यमांशी बोलतांना नाराजीही व्यक्त केली, आपण खैरेंचा प्रचार करणार नाही, शिवसेनेचा प्रचार करणार, असे सांगत मनातील सल बोलून दाखवली.

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला एक एक जागा महत्वाची आहे. ती जिंकायची असेल तर आधी पक्षांतर्गत कुरबुरी मिटवणे गरजेचे होते. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत खैरे-दानवे यांना जे काही सांगायचे होते, ते सांगितले आणि आज हे `राम-भरत भेटी` चे चित्र समोर आले. या भेटीमागे आणखी एक कारण दडलेले होते, ते म्हणजे अंबादास दानवे यांच्याविरोधात तयार झालेले संशयाचे जाळे. खैरे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होणार, हे स्पष्ट झाल्यापासूनच दानवे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते.

Ambadas Danve-Chandrakant Khaire
Nilesh Lanke News: नीलेश लंकेंनी घेतली मध्यरात्री बाळासाहेब थोरातांची भेट; दीड तास खलबतं...

हे कमी की काय? म्हणून भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही येत्या 4 जून रोजी ठाकरेंना मोठा धक्का बसणार, त्यांचा मराठवाड्यातील मोठा नेता फुटणार. अंबादास दानवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे म्हणजे आमचेच होते, असे म्हणत संशयाचे जाळे अधिक घट्ट केले. अर्थात दानवे यांनी माध्यमासमोर येऊन वारंवार खुलासा करत मी ठाकरेंसोबतच आहे, कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट केले. परंतु महायुतीचे संभाजीनगरच्या जागेवरून अडलेले घोडे आणि खैरे-दानवे यांच्या वादातून दानवे यांच्याबद्दल निर्माण झालेले संशयाचे जाळे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.

Ambadas Danve-Chandrakant Khaire
Devendra Fadnavis News : ‘आम्ही ऑपरेशन केले, तर तुम्हाला कळतच नाही’; दानवेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर फडणवीसांची गुगली

अखेर यावर पडदा टाकण्याचे ठरले आणि आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास दानवे यांनी खैरेंच्या डेक्कन येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा, पुष्पगुच्छ देत पेढा भरवला. खैरेंनीही आता जुनं सगळं सोडून द्या, इथून पुढे आम्ही एकत्र काम करणार? अशी ग्वाही दानवेंना पेढा भरवत दिली. या भेटीनंतरही दानवेंची खैरेंबद्दलची नाराजी मिटली का? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Edited By : Vijay Dudhale

Ambadas Danve-Chandrakant Khaire
Mahadev Jankar News : भाजपने राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवून निंबाळकरांच्या वाटेतील माढ्यातील अडसर दूर केला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com