Mahavikas Aghadi : ‘सर्व्हेत महाविकास आघाडीला अधिक जागा; त्यामुळेच नेते पळविले जाताहेत’

Praniti Shinde : सर्व्हे रिपोर्टमुळे सत्ताधारी घाबरले आहेत, त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबणीवर टाकली जात आहे.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama

Mangalvedha News : महाविकास आघाडीला विविध सर्व्हेमध्ये अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते पळविण्याचे काम भाजपकडून (सत्ताधारी) सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक त्यामुळेच लांबणीवर टाकली जात आहे. सर्व्हे रिपोर्टमुळे सत्ताधारी घाबरले आहेत, असा हल्लाबोल आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केला. (Praniti Shinde said reason for breaking leaders of Mahavikas Aghadi)

मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणी प्रश्नावर प्रणिती शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत बोलताना प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीचे नेते पळविण्याच्या भाजपच्या नीतीवर शरसंधान केले. त्या म्हणाल्या, लहानपणापासून मी सत्ता उपभोगली आहे. टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी मला राजकारण करायचे नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्याला माझे अधिक प्राधान्य आहे. काँग्रेसचा विचार कोणीही मारू शकत नाही. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde
Chavan Resign Impact : हिरामण खोसकर केनिया दौऱ्यावर; राजीनाम्याचा निर्णय नाशिकमध्ये परतल्यावर घेणार

सरकारने स्मार्ट सिटी योजना राबविण्यापेक्षा स्मार्ट गावे हा उपक्रम राबविण्याची गरज आहे. सरकार इतर कामांवर कोट्यवधींचा निधी खर्च करत आहे. मात्र, पाणी देण्यासाठी लागणारा निधी ही किरकोळ बाब आहे. पण, त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. मंगळवेढ्याच्या पाण्याचा प्रश्न मी यापूर्वी अनेकदा उपस्थित केला आहे. पण, मंगळवेढ्याच्या पाण्याचा विषय मला अर्धवट घ्यायचा नव्हता. त्यामुळेच मी त्यात लक्ष घातले नव्हते. अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता, तर अर्धवट पाणी मिळाले असते. भागातील पाण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी आवाज उठविणार आहे, असेही प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.

धर्म, जात हे विषय महत्त्वाचे आहेत. पण, धर्म धर्म करून एक दिवस जनता उपाशी मरेल, त्यामुळे काम करणाऱ्यांना जनतेनेही विसरू नये. दोन वेळा सत्ता देऊनही मंगळवेढ्याच्या विकासासाठी केलेल्या पाच गोष्टी सांगाव्यात. दोन वेळा संधी मिळूनही मंगळवेढा तालुक्यासाठी काहीच केलं नसेल तर त्यांना संधी का द्यायची, असा सवालही प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

Praniti Shinde
Praniti Shinde on Chavan Resign : ‘अशोक चव्हाणांसोबत भाजपने मोठा माइंड गेम खेळलाय; हताश होऊन त्यांनी राजीनामा दिलाय’

पाणी परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे म्हणाले, गेली काही वर्षांपूर्वी या योजनेला मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात पाणी येण्यास विलंब होत आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी कमी दाबाने मिळत आहे. आमच्या आजोबापासून या भागाला पाणी येणार असे ऐकत आहाेत. मात्र, प्रत्यक्षात पाण्याचा विषय अद्याप मार्गी लागला नाही. दुष्काळनिधी, गारपीट, पीकविमा या गोष्टीतही मंगळवेढ्यावर सातत्याने अन्याय होत आहे. या प्रश्नात लक्ष घालावे, अशी विनंती तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी दिली.

या वेळी सुनजय पवार, ॲड नंदकुमार पवार, फिरोज मुलाणी, माधवानंद आकळे, बिरुदेव घोगरे, लक्ष्मण गायकवाड, दिलीप जाधव, मारुती वाकडे, फिरोज मुलाणी, दादा पवार, अर्जुनराव पाटील, अमर सूर्यवंशी, नाथा ऐवळे, मनोज माळी, रविकिरण कोळेकर उपस्थित होते.

Edited By : Vijay Dudhale

R

Praniti Shinde
Ashok Chavan Resign Congress : विश्वासदर्शक ठरावाला उशीर ते भाजप पदाधिकाऱ्याच्या घरची चव्हाणांची ‘ती’ भेट ठरली महत्त्वपूर्ण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com