Praniti Shinde on Chavan Resign : ‘अशोक चव्हाणांसोबत भाजपने मोठा माइंड गेम खेळलाय; हताश होऊन त्यांनी राजीनामा दिलाय’

Congress News : चव्हाण यांच्या पत्नीही आमदार होत्या, त्यांच्याशीही माझं बोलणं झालं आहे.
Praniti Shinde-Ashok Chavan
Praniti Shinde-Ashok ChavanSarkarnama

Solapur News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या निर्णयामुळे काँग्रेस पक्षात मोठा भूकंप झाला आहे. त्यावर आता काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा का दिला, याचे कारण सांगितले आहे. (BJP played big mind game with Ashok Chavan : Praniti Shinde)

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाने ईडीची भीती दाखवल्यामुळेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर वारंवार छापेमारी करण्यात येत होती. प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. त्यातूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde-Ashok Chavan
Ashok Chavan's Resignation : अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेस सोडणारे, ११ नव्हे तर १७ आमदार ? 'ही' आहेत संभाव्य नावे !

अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे, ते पुढे काय करणार, याबाबत त्यांनी सांगितलं नाही. चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हेही मुख्यमंत्री होते. तसेच चव्हाण यांच्या पत्नीही आमदार होत्या, त्यांच्याशीही माझं बोलणं झालं आहे. त्यांच्यात असलेलं स्ट्रेस लेव्हल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळला गेला, ते मी रेकॉर्डवर आणू शकतं नाही; पण त्यांनी अतिशय हताश होऊन हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमधील अजूनही अनेक नेत्यांना त्रास देणे सुरू आहे. हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.

अशोक चव्हाण यांनी राजीनामा देणं, ही काँग्रेससाठी दुर्दैवी गोष्ट आहे. चव्हाण हे भारदस्त नेता होते. पण, हे भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं आहे, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, सुशीलकुमार शिंदे यांच्या राजीनाम्याबाबत जे सध्या सुरू आहे. त्या सर्व अफवा आहेत. मी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत अगोदरच स्पष्टीकरण दिलेले आहे. माझ्या बाबतीत केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्याकडे कोणत्याही संस्था नाहीत, त्यामुळे ईडीची भीती ते आम्हाला दाखवू शकत नाहीत; पण भारताची एक नागरिक म्हणून मला भाजपचे विचार पटत नाहीत.

Praniti Shinde-Ashok Chavan
Ashok Chavan Resign Congress : विश्वासदर्शक ठरावाला उशीर ते भाजप पदाधिकाऱ्याच्या घरची चव्हाणांची ‘ती’ भेट ठरली महत्त्वपूर्ण...

काँग्रेस पक्षाच्या इतर कोणत्याही आमदाराने राजीनामा दिलेला नाही. पक्ष नेतृत्व सर्वांच्या संपर्कात आहेत, असे सांगून त्यांनी बावनकुळे यांच्या विधानावर प्रणिती म्हणाल्या, काँग्रेस पक्ष अजूनही भक्कम आहे, भाजप केवळ आम्ही अन्स्टेबल आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या नेत्यांवर प्रेशर आणून सायकॉलॉजिकल गेम खेळत आहेत. काँग्रेस हा विचार भाजप कधीही संपवू शकणार नाही

Praniti Shinde-Ashok Chavan
Ashok Chavan Resigned From Congress : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर फडणवीस म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या!

आमचा केवळ एक राजकीय शत्रू आहे, तो म्हणजे भाजप, त्यासाठी महाविकास आघाडीत असलेले सर्व समविचारी पक्ष हे शेवटपर्यंत एकत्र राहतील. वंचित बहुजन आघाडीदेखील आमच्या सोबत राहील, असेही प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

R

Praniti Shinde-Ashok Chavan
मोठी बातमी : चव्हाणांपाठोपाठ जवळगावकर, हंबर्डे, अंतापूरकर हे तीन आमदारही 'नॉट रिचेबल'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com