Paricharak-Autade : परिचारक-आवताडेंचे आता टार्गेट मंगळवेढा; विधानसभेनंतर दोघांचा प्रथमच एकत्रित मेळावा

Mangalvedha Nagar Parishad Election : मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक एकत्र आले असून, संयुक्त मेळाव्यातून निवडणूक जिंकण्याची रणनीती आणि एकजूट दर्शवली आहे.
Samadhan Autade-Prashant Paricharak
Samadhan Autade-Prashant ParicharakSarkarnama
Published on
Updated on
  1. पंढरपूरमध्ये निवडणूक एकत्र लढविल्यानंतर भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक आता मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करत आहेत.

  2. पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी व भालके यांच्या मजबूत एकत्रिकरणाला उत्तर म्हणून भाजपच्या दोन्ही नेत्यांनी एकत्रित रॅली घेतली होती, आता त्याच जोशात मंगळवेढ्यात मोर्चेबांधणी सुरू आहे.

  3. मंगळवेढ्यात भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने मुकाबला तीर्थक्षेत्र विकास आघाडी व भाजपमध्ये चुरशीचा होणार आहे.

Solapur, 03 December : पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा आखाडा एकत्रितपणे लढविणारे भाजपचे आजी माजी आमदारांनी आता मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आता मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीचे जिंकण्याचे उद्दिष्ठ समोर ठेवले आहे, त्यासाठी त्यांनी मंगळवेढा शहरात विधानसभेनंतर प्रथमच एकत्रितपणे जाहीर मेळावा घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यात अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती, तर मंगळवेढा (Mangalvedha) नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मंगळवेढ्यासाठी आता येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये रंगतदार झाली आहे, त्यामुळे पंढरपुरात कमळ फुलणार की भालकेंची आघाडी बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर (Pandharpur) नगरपरिषद निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून भगीरथ भालके, मनसेचे दिलीप धोत्रे आणि विठ्ठल परिवारातील सर्व नेतेमंडळींनी भालके यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून भालके यांनी परिचारक यांच्या नगरपलिकेतील अनेक वर्षांच्यास वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पंढरपुरात भालकेंनी हवा तर तशी तयार केली आहे.

भालके यांच्यासह विठ्ठल परिवारातील नेत्यांच्या एकत्रित ताकदीला भाजपकडून आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रत्युत्तर दिले. आमदार आवताडे हे प्रथमच पंढरपुरात नगरपरिषदेच्या निवडणुकीत सहभागी झाले होते. आतापर्यंत परिचारक हे एकहाती किल्ला सांभाळत होते. मात्र, आवताडेंनी पहिल्यांदाच पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रचारात किल्ला लढवला.

Samadhan Autade-Prashant Paricharak
Shiv sena UBT : बाळासाहेबांपासून आदित्यसोबत काम केलेला शिवसेनेचा बडा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

दरम्यान, पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक संपताच परिचारक आणि आवताडे यांनी पुढे गेलेल्या मंगळवेढा नगरपरिषदेसाठी तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगानेच भाजपच्या आजी-माजी आमदारांनी एकत्रितपणे मंगळवेढ्यात मेळावा घेतला. त्यात त्यांनी स्थानिक विरोधकांना लक्ष्य करण्याबरोबरच तुम्हाला शहराचा प्रथम नागरिक निवडण्याचा अधिकार मिळाला आहे, असेही स्पष्ट केले.

मंगळेवढा नगरपालिका निवडणुकीतही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचेच भाजपला आव्हान असणार आहे. या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादी नेत्याच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मंगळवेढ्यात झेंडा नक्की फडकणार, याची उत्सुकता आहे.

Samadhan Autade-Prashant Paricharak
MLC Controversy : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय; न्यायमूर्ती म्हणाले ‘राज्यासाठी अत्यंत महत्वाचा....’

1) मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीवर भाजपचे कोण लक्ष केंद्रीत करत आहे?

→ आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक.

2) पंढरपूरच्या निवडणुकीत भाजपला कोणाचे आव्हान होते?

→ भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखालील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे.

3) मंगळवेढ्यात भाजपची नगराध्यक्ष उमेदवार कोण आहेत?

→ राष्ट्रवादी नेत्याच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.

4) मंगळवेढ्यात प्रमुख सामना कोणामध्ये होणार आहे?

→ भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com