Solapur ZP : प्रतापसिंह मोहिते पाटलांनी मराठा-ओबीसी केमिस्ट्री जुळवली अन्‌ जिल्हा बॅंकेचे शिपाई नारायण खंडागळे ZP अध्यक्ष बनले

Zillha Parishad Election : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तब्बल 23 वर्षांनंतर ओबीसी पुरुषासाठी राखीव झाले. मराठा-ओबीसी समीकरणाला पुन्हा उजाळा मिळत असून अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे उत्सुकता आहे.
Pratapsinh Mohite Patil-Narayan Khandagle-vaishali Satpute
Pratapsinh Mohite Patil-Narayan Khandagle-vaishali SatputeSarkarnama
Published on
Updated on
  1. 2002 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने मराठा समाजातील नारायण खंडागळे यांनी कुणबी प्रमाणपत्र वापरून हे पद मिळवले.

  2. तब्बल 23 वर्षांनंतर 2025 मध्ये पुन्हा एकदा ओबीसी पुरुषासाठी अध्यक्षपद राखीव झाले असून जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रधारकांची संख्या 50 हजारांवर पोहोचल्याने निवडणुकीत मोठी चुरस अपेक्षित आहे.

  3. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना आदी पक्षांमध्ये स्पर्धा वाढली असून धनगर, माळी, लिंगायत आणि कुणबी मराठा या गटांचा निर्णायक प्रभाव राहणार आहे.

Solapur, 20 September मराठा कुणबी कार्ड वापरून ओबीसीच्या जागेवर करमाळ्याचे नारायण खंडागळे 21 मार्च 2002 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 2005 मध्ये उर्वरित अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यानंतर ओबीसी समाजातील वैशाली सातपुते यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यावेळी ओबीसी-मराठा केमिस्ट्री माजी राज्यमंत्री (स्व.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी जुळविली होती.

आताही सोलापूर जिल्हा परिषदेचे (Solapur ZP)अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी ओबीसीसाठी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) राखीव झाले आहे. ओबीसी पुरुषाला अध्यक्षपदाची संधी तब्बल 23 वर्षानंतर मिळाली आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळून अध्यक्ष कोण होणार? याची उत्सुकता वाढली आहे.

जिल्हा परिषदेच्या 2002 च्या निवडणुकीत सोलापूरचे अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले होते. त्या वेळी मोहिते पाटील यांच्या कलाने सोलापूरचे राजकारण चालायचे. ते म्हणतील तोच सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचा. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबरच (स्व.) प्रतापसिंह मोहिते पाटील (Pratapsinh Mohite Patil) यांचाही जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा होता.

करमाळा तालुक्यातील पांडे जिल्हा परिषद गटातून नारायण खंडागळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. ते मराठा समाजाचे होते. मात्र, त्यांच्याकडे कुणबी दाखला होता. शिवाय, मोहिते पाटील यांच्या ऐकण्यातील होते. त्यामुळे आपलाच माणूस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्याचा निर्णय मोहिते पाटील यांनी घेतला.

विशेषतः प्रतापसिंह मोहिते पाटील हे नारायण खंडागळे यांच्यासाठी आग्रही होते, त्यामुळे प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी कुणबी दाखला असलेले मराठा समाजाचे नारायण खंडागळे हे ओबीसी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले. खंडागळे हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत शिपाई म्हणून काम करत होते. मात्र, मोहिते पाटलांनी आपल्याच मर्जीतील माणूस म्हणून नारायण खंडागळे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले.

Pratapsinh Mohite Patil-Narayan Khandagle-vaishali Satpute
Barshi Crime : बार्शीतील कला केंद्रात पुन्हा क्राईम; ‘आईकडून 20 लाख मागून घे; नाहीतर हातपाय तोडेन’, खंडणीसाठी मॅनेजरचे अपहरण

दरम्यान, तब्बल 23 वर्षांनंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुन्हा एकदा ओबीसी पुरुषासाठी राखीव झाले आहे, त्यामुळे नारायण खंडागळे यांच्या नियुक्तीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. तसेच, तोच डाव पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सोलापूर जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपाची संख्या 50 हजाराच्या पार गेली आहे.

बार्शी, करमाळा, माढा, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांत सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्र आहेत. जिल्ह्यातील कुणबी मराठ्यांचे हे नवीन बालेकिल्ले म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. त्यामुळे यंदाच्या अध्यक्ष निवडीत चुरस दिसणार आहे. कोणत्या दिग्गज नेत्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे? याचा कानोसाच आता घेतला जाऊ लागला आहे. जिल्हा परिषदेच्या गटासाठी सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात आरक्षण सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. या सोडतीनंतर लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात 11 पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार आमदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक व शेतकरी कामगार पक्षाचा एक आमदार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन प्रमुख पक्षांचा एकही आमदार नाही. जिल्हा परिषदेची लढत ही महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशी जरी वाटत असली तरी खरी लढत ही भाजप विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातच होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या विरोधात कोण कोण लढणार आणि कसे कसे लढणार यावरही आगामी अध्यक्ष निवडीतील चुरस अवलंबून आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद 2002 मध्ये ओबीसी झाल्याने नारायण खंडागळे यांना संधी मिळाली. त्यानंतर 2005 मध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असूनही ओबीसी प्रवर्गातील वैशाली सातपुते यांना संधी मिळाली होती. त्यानंतर 2007 मध्ये अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने सुमन नेहतराव अध्यक्ष झाल्या. पुढील अडीच वर्षांत 2009 मध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण झाल्याने बळीराम साठे,

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद 2012 मध्ये ओबीसी महिला झाल्याने डॉ. निशिगंधा माळी, 2015 मध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने जयमाला गायकवाड, 2017 मध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण झाल्याने संजयमामा शिंदे व 2019 मध्ये अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनिरुद्ध कांबळे यांना संधी मिळाली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी 2002 नंतर ओबीसी सर्वसाधारण हे आरक्षण कधी पडले नाही. आता तब्बल 23 वर्षांनी 2025 मध्ये ओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात धनगर, माळी व लिंगायतमधील ओबीसी समाज निर्णायक आहेत. पण, कुणबी मराठा प्रमाणपत्रधारकांची संख्याही 50 हजारांहून अधिक झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्ष निवडताना धनगर, माळी यासोबत कुणबी मराठा हा देखील फॅक्टर निर्णायक ठरणार आहे.

Pratapsinh Mohite Patil-Narayan Khandagle-vaishali Satpute
Ambadas Danve : शेतीचा शिमगा झालायं, कृषीमंत्री कुठे आहेत ? अंबादास दानवेंचा सरकारला सवाल
  1. : नारायण खंडागळे कधी अध्यक्ष झाले?
    उ: 21 मार्च 2002 रोजी.

  2. प्र: 2025 मध्ये अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे?
    उ: ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी.

  3. प्र: सोलापूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रधारकांची संख्या किती झाली आहे?
    उ: 50 हजारांहून अधिक.

  4. प्र: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रमुख लढत कोणती आहे?
    उ: भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com