Loksabha Election 2024 : जयंतरावांच्या चिरंजीवाची हातकणंगलेमधील लोकसभेची ‘हवा’ जिरली

Prateek Patil News : इंडिया आघाडीतून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीच प्रतीक पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला होता.
Prateek Patil-jayant Patil
Prateek Patil-jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : मागील काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीतून जयंत पाटील यांचे चिरंजीव आणि राजारामबापू पाटील सहकारी कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा होती. त्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू होत्या. जयंत पाटील यांनीही लोकसभा मतदारसंघात चाचपणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळाले. त्यानंतर जयंतराव राज्यभर दौरे करीत असल्याने प्रतीक यांच्या लोकसभा निवडणुकीची मोहीम थंडावली आहे. राष्ट्रवादीतील काही नेत्यांकडूनही याबाबत ‘नो कॉमेंट्स’ म्हणून प्रतिक्रिया दिली जात आहे. (Prateek Patil's Lok Sabha candidature discussion has cooled down)

आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याचे संकेत आहेत. तीन महिन्यांपूर्वी जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यादृष्टीने जयंत पाटील आणि त्यांच्या टीमकडून मतदारसंघात दौरे करून नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा हातकणंगलेमध्ये जोर धरू लागताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची कोंडी होण्याची चर्चाही सुरू झाली होती. या दरम्यान साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने स्वाभिमानीने आंदोलनाचे अस्त्र उगारले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prateek Patil-jayant Patil
Hiraman Khoskar will Resign? : ‘त्या’ इतिहासामुळे खोसकर काँग्रेस सोडताना दहा वेळा विचार करतील!

ऊसदरासाठी धडक देत स्थापन झाल्यापासून प्रथमच राजारामबापू कारखाना एक दिवसासाठी बंद पाडला. यावरही अध्यक्ष या नात्याने प्रतीक पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काही कारखान्यांनी ऊसदराची कोंडी फोडल्याचा राजू शेट्टी यांचा दावा आहे. ऊस उत्पादकांच्या ताकदीवर मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा तयारी चालवली आहे. ऊस उत्पादकांची मोठ बांधून हातकणंगलेतून रणशिंग फुंकले आहे, परंतु भाजप आणि इंडिया आघाडी शेट्टी यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असल्याने प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा विरली आहे.

इंडिया आघाडीतून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीच प्रतीक पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला होता. त्याचवेळी हातकणंगलेतील सहा विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून गोपनीयरित्या चाचपणी करण्यात आली होती. यामध्ये प्रतीक पाटील नंबर एकला असल्याचे दिसून आले. इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात प्रतीक पाटील यांनी पक्षबांधणीसाठी काही नवीन निवडीची चाचपणी केली. परंतु निर्णय मात्र गुलदस्तात ठेवण्यात आला.

Prateek Patil-jayant Patil
Ashok Chavan Resignation : चव्हाणांच्या काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यानं सगळंच काढलं, भाजपवरही केला हल्लाबोल

राज्य पातळीवरील घडामोडी पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह गेले आहे. शरद पवार संकटात सापडल्यानंतर पक्षाचे नेते या नात्याने जयंत पाटील हे खिंड लढवित आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाबाबत निर्णय दिल्यानंतर पाटील हे महाराष्ट्रातले काही जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. जयंत पाटील हे पक्षबांधणी आणि राज्याच्या दौऱ्यात अडकल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत सर्वांनीच मौन बाळगल्याचे चित्र दिसत आहे, त्यामुळेच अचानकपणे प्रतीक यांच्या नावाची राजकीय हवा थंडावली आहे.

R

Prateek Patil-jayant Patil
Congress-Shivsena Leader News : काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची नात होणार शिवसेनेच्या माजी आमदाराची सूनबाई...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com