Shivsena News : विधानसभेसाठी ठाकरेंच्या सेनेची साताऱ्यात चाचपणी; भास्कर जाधवांवर विशेष जबाबदारी

Assembly Election 2024 : ठाकरेंच्या शिवसेनेने सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या तयारीला जोरदार तयारी सुरु केली असून पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी भास्कर जाधव यांच्यावर दिली आहे.
Bhaskar Jadhav-Uddhav Thackeray
Bhaskar Jadhav-Uddhav ThackeraySarkarnama

Satara, 17 June : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेही तालुकानिहाय बैठका सुरु केल्या आहेत. सर्व आठही विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपात काय ठरेल, ते त्या त्या वेळी पाहिले जाईल. पण, सध्या तरी ठाकरेंच्या शिवसेनेने जिल्ह्यात विधानसभेच्या तयारीला जोरदार तयारी सुरु केली असून पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर दिली आहे.

फुट पडल्यानंतरही लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला (Shivsena) तब्बल नऊ खासदार मिळाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेने आता विधानसभेसाठी (Assembly Election) तयारी सुरु केली आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या सातारा (Satara) जिल्ह्यात तालुकानिहाय बैठकांचे सत्र सुरु केले आहे. त्यासाठी संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, हर्षद कदम, संजय भोसले यांच्या माध्यमातून बैठका सुरु आहेत.

सातारा, वाई व कोरेगावची जबाबदारी सचिन मोहितेंवर तर हर्षद कदम यांच्यावर पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिणची जबाबदारी आहे. तर माढाची जबाबदारी संजय भोसलेंवर आहे.सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंची शिवसेना जरी महाविकास आघाडीत असली तरी या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आहे. आता विधानसभेसाठी आठही विधानसभा मतदारसंघात शिवसेना चाचपणी करणार आहे.

पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी भास्कर जाधव यांच्यावर दिली गेली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या माध्यमातून विधानसभेची आणखी चांगल्या प्रकारे बांधणी शिवसेनेची होणार आहे.

Bhaskar Jadhav-Uddhav Thackeray
Narendra Patil : विधानसभेलाही मराठ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसणार; बड्या नेत्याने थेट सुनावले

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काहीही होईल. पण, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपली ताकत लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यात सर्व आठही मतदारसंघात तयारी केली आहे. त्यासाठी तालुकास्तरावरील बैठकांतून उमेदवारांची चाचपणी होत आहे.

जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्ह्यातील काही जागांवर हक्क सांगितला जाणार आहे. पण, त्यासाठी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यासाठी तयार होणार का, याची उत्सुकता आहे

Bhaskar Jadhav-Uddhav Thackeray
South Solapur Assembly : दक्षिण सोलापूरसाठी माने, हसापुरे, मिस्त्री इच्छूक; सुशीलकुमार शिंदे कोणाला तिकिट देणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com