Narendra Modi News : पंतप्रधान मोदींची 28 एप्रिलला कोल्हापुरात सभा, तपोवनात येणार भगवं वादळ !

Kolhapur Lok Sabha Constituency 2024 : पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर नियोजनाची जबाबदारी..
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Kolhapur Political News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तेथे प्रचारावर जोर दिला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक आणि धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनेक मातब्बर प्रचारासाठी या दोन मतदारसंघात तळ ठोकून आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील तपोवन मैदानावर सभा होणार आहे.

या दोन्ही मतदारसंघात आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात पार पडणार असून, कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 28 एप्रिलला रोजी तपोवन मैदान, कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Lok Sabha Election 2024 : बारामतीत आणखी एका 'तुतारी'ची एन्ट्री; शरद पवारांच्या पक्षाची आयोगाकडे धाव

या सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील इतर मंत्री उपस्थित राहणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर नियोजनाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.

या सभेसाठी पंतप्रधान मोदी येणार असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव विशेष काळजी पोलिस तसेच जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. महायुतीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी महायुतीत सहभागी असलेल्या पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

सभेची जय्यत तयारी सुरू

कोल्हापूर येथील तपोवन मैदान येथे सभेची जय्यत तयारी सुरू आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून या सभेसाठी करते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी जयत तयारी करण्यात आली आहे. जवळपास एक लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून सभेचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जाते.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Narendra Modi
Thackeray Vs Shinde: गोडसेंना उमेदवारी मिळताच ठाकरे गटातील बडा नेता शिंदेंच्या गळाला लागणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com