Thackeray Vs Shinde: गोडसेंना उमेदवारी मिळताच ठाकरे गटातील बडा नेता शिंदेंच्या गळाला लागणार?

Nashik Lok Sabha Constituency 2024 : करंजकर यांच्या कार्यपद्धतीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विविध निवडणुकांमध्ये झालेल्या घटनांची माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती. त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होतात ठाकरे गटाचा एक महत्त्वाचा नेता शिंदे गटाच्या गळ्याला लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचे राजकारण दिवसेंदिवस रंजक होत चालले आहे.

नाशिक मतदारसंघातील उमेदवारीवरून (Nashik Lok Sabha Constituency 2024) शिवसेना ठाकरे गटाच्या अन्य इच्छुकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश आले नाही. त्यामुळे येथे एक दोन दिवसांत उमेदवारी न मिळालेले विजय करंजकर शिंदे गटात प्रवेश करण्याची विश्वसनीय माहिती आहे.

महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून येत्या एक-दोन दिवसांत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. ही उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटातील माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा भगूर येथील त्यांच्या गटाच्या नगरसेवकांना गळ्याला लावण्यात ते यशस्वी होणार आहेत. खासदार गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच विजय करंजकर यांचा शिंदे गटात प्रवेश होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अनेक तक्रारी

विजय करंजकर (Vijay Kanrajkar) हे शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार होते. मात्र, त्यांच्या कामकाजाविषयी अनेक तक्रारी आहेत. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात हा विस्कळीतपणा प्रकर्षाने समोर आला. आदित्य ठाकरे यांच्या साकुर फाटा येथील सभेची कोणतीच तयारी झालेली नव्हती, त्यामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेते करंजकर यांच्यावर ते अतिशय नाराज होते.

स्थानिक पातळीवरून करंजकर यांच्या कार्यपद्धतीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या विशेषतः शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विविध निवडणुकांमध्ये झालेल्या घटनांची माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती. त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, असे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Nashik Politics: गोडसे, बोरस्तेंच्या स्पर्धेत कोकाटेंची एन्ट्री, उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार

भेट टाळली....

ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावर करंजकर यांनी नाराजी व्यक्त करून निवडणूक लढविणार, अशी घोषणा केली होती. या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करू असेदेखील त्यांनी सांगितले होते. त्यानंतर नाराज करंजकर यांना दोन वेळा मातोश्रीवरून भेटण्याचा निरोप देण्यात आला.

मात्र, करंजकर यांनी हे भेट टाळली. त्यांच्या मनात वेगळेच काहीतरी आहे. ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. बडगुजर यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

नाशिकचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी यापूर्वीच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ करंजकर अनेक नगरसेवकांसह शिंदे गटात दाखल होतील. त्याचे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. करंजकर गेल्या दोन दिवसांपासून वर्षा निवासस्थानाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com