Narendra Modi Sabha In Madha: मोहिते पाटलांना जोर का झटका देत माढा पुन्हा जिंकण्यासाठी मोदी उतरणार मैदानात!

Madha Loksabha Election 2024 : आता माढ्यातून भाजपचे नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होत आहे.
Narendra Modi-Ram Satpute-Ranjitshinh Naik Mimbalkar
Narendra Modi-Ram Satpute-Ranjitshinh Naik MimbalkarSarkarnama

Solapur News : माढा मतदारसंघ राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. या ठिकाणी रोज नवनवे राजकीय घडामोडी घडत आहे. भाजपने उमेदवार रणजीतसिंह निंबाळकरांना दुसर्यांदा उमेदवारी दिल्यानंतर आता मोहिते पाटील गट चांगलाच अस्वस्थ झाला.

एवढंच नाही तर धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली.मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीघनंतरही या मतदारसंघात महायुती सध्या बॅकफूटवर दिसून येत आहे.याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी माढ्याची जागेसाठी सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Narendra Modi-Ram Satpute-Ranjitshinh Naik Mimbalkar
Farmer Issue : कापूस, सोयाबीन आणि तुर उत्पादकांचे प्रश्न निवडणुकीत सुटले काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याचा लोकसभा निवडणुकीत फायदा उचलत जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या हा एनडीए आणि महायुतीचा प्लॅन आहे. यात आता धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यात लढत होत असलेल्या, आणि सध्या भाजपसाठी आव्हानात्मक ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

मोहिते पाटलांनी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे,उत्तमराव जानकर यांच्यासह फलटणकरांना देखील आपल्या बाजूने ओढून घेत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांची (RanjeetSinh Nimbalkar) डोकेदुखी वाढवली आहे. पण आता थेट माढ्यासाठी पंतप्रधान मोदीच मैदानात उतरणार आहे.

मोहिते पाटलांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi येत्या 30 एप्रिलला सकाळी 11 वाजता सभा घेणार आहेत. या सभेमुळे काहीशे बॅकफूटवर गेलेल्या भाजप आणि निंबाळकरांना मोठा बूस्ट मिळण्याची शक्यता आहे. या सभेच्या तयारीला भाजपसह सर्व मित्रपक्ष लागले आहे. या सभेविषयी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी माहिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सभेसाठी पंतप्रधान मोदींसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अकलूज येथे पंतप्रधान मोदींची अशीच विराट सभा झाली होती.

माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला भाजपमधील मोहिते पाटील तर अजित पवार गटातील नाईक निंबाळकर कुटुंबाने विरोध केला. मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता भाजपने खासदार नाईक निंबाळकरांनाच तिकीट दिले. यावर नाराज झालेल्या दोन्ही कुटुंबांने बंड केले.

आता माढ्यातून भाजपचे नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील Dhairysheel Mohite Patil अशी लढत होत आहे. यात रामराजे नाईक निंबाळकरांचे चिरंजीव अनिकेत यांनी मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फोडला. यामुळे माढ्यातील राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Narendra Modi-Ram Satpute-Ranjitshinh Naik Mimbalkar
Pankaja Munde Vs Bajrang Sonnwane : कोट्यधीश उमेदवार; पण सरस कोण ठरणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com