Jaykumar Gore : पृथ्वीराजबाबांचे ते विधान म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण; जयकुमार गोरेंनी संधी साधली

Prithviraj Chavan's Statement : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी समाचार घेतला आहे.
Jaykumar Gore-Prithviraj Chavan
Jaykumar Gore-Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Karad, 02 August : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीच्या निर्दोषत्वावरून पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धारेवर धरले आहे. हिंदु दहशतवादी कधीही असू शकत नाहीत, हे न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. भगवा दहशतवादावरून पृथ्वीराज चव्हाण यांना उशिरा शहाणपण सूचले आहे, असा टोला त्यांनी चव्हाण यांना लगावला

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे शनिवारी (ता. 02 ऑगस्ट) कऱ्हाडच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची झालेली निर्दोष मुक्तता आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतावाद या शब्दाबाबत केलेले भाष्य यावर जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी चव्हाण यांना टोला लगावला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर भगवा दहशतवाद हा शब्द वापरु नये. कारण, भगवा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकऱ्यांच्या झेंड्याचा रंग आहे, त्यामुळे भगवा दहशतवाद न म्हणता हिंदुत्ववादी दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद असा उल्लेख करावा, असे सुचविले होते.

गोरे म्हणाले, न्यायालयाच्या निकालाने हिंदू दहशतावदी कधीही असू शकत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे केवळ कऱ्हाडचे नेते नसून ते देशाचे नेते आहेत. भगवा दहशतवादाबाबत त्यांना उशीरा शहाणपण सुचले आहे. पण काँग्रेसचेच लोक भगवा दशतवाद म्हणत होते. काही जणांवर भगवा दशहतवाद म्हणून कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, कोर्टाने त्यांना चपराक लगावली आहे.

Jaykumar Gore-Prithviraj Chavan
Solapur Shivsena : सोलापुरात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शहर समन्वयक, उपजिल्हाप्रमुखांसह 11 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी दबाव होता, हेही आता स्पष्ट झाले आहे. हिंदूंवर कारवाई करणे, हे कॉंग्रेस पक्षाचे सातत्याने चालेले षडयंत्र आहे. हिंदू दहशतवादी असू शकत नाही, हे कोर्टाने दिलेल्या निकालातून स्पष्ट झाले आहे. पण, भगव्या दहशतवादाबद्दल कॉंग्रेसच्या नेत्यांनी कधीही बोलायचे सोडले नाही, त्यामुळे चव्हाण यांना ते उशीरा सुचलेले शहाणपण आहे.

Jaykumar Gore-Prithviraj Chavan
Rajendra Raut on Rohit Pawar : राजेंद्र राऊतांचे राेहित पवारांना चॅलेंज; ‘आजोबांकडून शिका... रणवीरचा गाड्यांच्या जाळपोळशी संबंध नाही’

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामध्ये जनतेच्या मनातील निकाल लागला आहे, त्यामुळे बाकीच्यांनी कोणी यामध्ये बोलणे उचित नाही. कोणी, कशाप्रकारे षडयंत्र रचले, हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे महायुतीला कोणीही शहाणपण शिकवू नये, जनतेला जे आवश्यक आहे, ते महायुती सरकार करत आहे, असा दावाही जयकुमार गोरे यांनी केला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ, सागर शिवदास यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com