Sangram Thopte : थोपटेंसाठी भाजप आमदार मांडेकरांना देखील शिंगावर घेणार, दोन्ही नेत्यांमध्ये विकोपाचा संघर्ष; राष्ट्रवादीचे आमदार काय बोलून गेले?

Sangram Thopte Vs Shankar Mandekar Conflict : राज्याच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सत्तेत आहेत. पण दोन्ही पक्षात सध्या पुण्यातील भोरमध्ये विकोपाचा संघर्ष पाहायला मिळत आहे.
Shankar Mandekar News
Shankar Mandekar NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भोरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांमध्ये उघड संघर्ष पाहायला मिळाला.

  2. संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यातील वाद उद्घाटन कार्यक्रमात समोर आला.

  3. मांडेकर यांच्या वक्तव्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निषेध केला.

Pune News : राज्याच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सोबत असली तरी भोरमध्ये मात्र दोन्ही पक्षांमध्ये विकोपाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार संग्राम थोपटे तर दुसऱ्या बाजूला आमदार शंकर मांडेकर यांच्यामध्ये उघड उघड संघर्ष पाहायला मिळत आहे.

सुरुवातीला हा संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला मात्र या निवडणुका झाल्यानंतर देखील विकास कामांच्या मुद्द्यावरून या हे दोन्ही नेते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतच भोर मधील व्यापारी संकुलाच्या उद्घाटनावरून या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष झाल्याचे पाहायला मिळालं. या व्यापार संकुलाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून वेगवेगळे कार्यक्रम घेऊन या व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आलं.

या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना शंकर मांडेकर यांनी थोपटे यांच्यावर सडकून टीका केली. मांडेकर म्हणाले, अनेक वर्षे सत्तेत असूनही विरोधकांनी काहीच केले नाही. सहा वर्षे धुळ खात पडलेल्या व्यापारी संकुलाचे काम आम्ही निधी देऊन पूर्ण केले, तरीही माझ्या नावावरून दमदाटी केली जात आहे,"

Shankar Mandekar News
Sangram Thopte : संग्राम थोपटेंच्या घरात मोठं पद? जिल्हा परिषदेतील नेतृत्वासाठी भोर, शिरूर, आणि पुरंदरमध्ये रस्सीखेच

"मी सरळ असलो तरी वाकडाही आहे; तुमची राजेशाही घरी ठेवा. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलात तर सोडणार नाही. धमक असेल तर वेळ आणि ठिकाण सांगा, तिथे येतो," असे थेट आव्हान त्यांनी दिले. ​"मुळशीत जाऊन चौकशी करा, शंकर मांडेकर काय 'कॅरेक्टर' आहे ते कळेल. कोणी दादागिरी केली तर ती खपवून घेणार नाही," असा इशारा देत आपण कोणाच्या बापाला घाबरत नसल्याचं मांडेकर म्हणाले होते.

त्यानंतर आज भाजपच्या स्थानिक नेते आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडेकरांच्या वक्तव्याचा निषेध केला. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी आपण शंकर मांडेकर यांची वरिष्ठ पातळीवर देखील तक्रार केली असल्याचं सांगितलं.

तसेच थोपटे यांच्याबाबत मांडेकर हे बिन बुडाचे आरोप करत असून थोपटे यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप मोठ्या प्रमाणात निधी या मतदारसंघांमध्ये आणला असून अनेक शिक्षण संस्थांच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलं असल्याचं यावेळी उपस्थित नेत्यांनी सांगितलं.

मांडेकर यांनी भाषणामध्ये आपली पार्श्वभूमी सांगितली. एक प्रकारे त्यांना मी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून मी दादा होतो असं कदाचित सुचवायचं असावं. कारण सातत्याने त्यांची भाषा ही दादागिरी आणि जिरवा जिरवीची होती. मात्र आमची भाजपची संस्कृती तशी नाही, त्यामुळे त्यांच्या पातळीवर जाऊन आम्ही उत्तर देणार नाही. मात्र मांडेकर यांनी वक्तव्य केलं की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि ज्यांना घाबरत होतो ते आता दिवंगत झाले आहेत. मात्र या मातीतल्या लोकांनी देखील अनेकांना अंगावरती घेऊन शिंगावरती घेतल्याचं इतिहास आहे, असा सूचक इशारा यावेळी भाजप नेत्यांकडून मांडेकर यांना देण्यात आला.

Shankar Mandekar News
Sangram Thopte: भोरच्या नादात संग्राम थोपटेंचं राजगडकडं दुर्लक्ष! शंकर मांडेकरांनी साधली संधी; राष्ट्रवादीचं दमदार कमबॅक

FAQs :

1. भोरमध्ये नेमका वाद कशामुळे झाला?
उद्घाटन कार्यक्रमादरम्यान शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांच्यावर टीका केल्याने वाद पेटला.

2. या प्रकरणात कोण-कोण सहभागी आहेत?
भाजप नेते संग्राम थोपटे आणि आमदार शंकर मांडेकर हे मुख्य व्यक्ती आहेत.

3. भाजपने काय भूमिका घेतली?
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडेकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

4. हा वाद कोणत्या कार्यक्रमात झाला?
व्यापारी संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी हा वाद समोर आला.

5. या घटनेचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
भोरमधील भाजप-राष्ट्रवादी संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com