

जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड 18 तारखेला होणार असून भाजपचा गटनेता देखील निवडला जाणार आहे.
भोर, शिरूर आणि पुरंदर तालुका गटनेते पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
स्वरूपा थोपटे यांचे नाव वरिष्ठांकडे पाठवण्यात आले असून थोपटे घराण्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा मुहूर्त जाहीर झाला असून येत्या 18 मार्चला अध्यक्षाची निवड होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकहाती बहुमत असल्याने अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार हे निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत सध्या अध्यक्षपदासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरु आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच चांगलं यश मिळवलेल्या भाजपचा गटनेता देखील निवडला जाणार आहे. या निवडीसाठी स्थानिक पातळीवरून ३ नाव वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहेत. गटनेते पदाच्या रेसमध्ये भोर, शिरूर आणि पुरंदर तालुका आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचा जो जिल्हा परिषदेमध्ये गटनेता होईल तोच विरोधी पक्ष नेता असेल असं मानलं जात आहे.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या ज्या 10 जागा निवडून आल्या आहेत, त्यापैकी सर्वाधिक जागा या शिरूरमधून आल्या आहेत. त्या ठिकाणी भाजपचे ३ जिल्हा परिषद सदस्य निवडणूक जिंकले आहेत. त्यापाठोपाठ भोरमधून २ आणि पुरंदरमधून २ जिल्हा परिषद गटात विजय मिळवला आहे. तर मुळशी, दौंड आणि हवेलीमध्ये प्रत्येकी एक जागा भाजपला मिळाली आहे. त्यामुळे गटनेतेपदासाठी शिरूर, भोर आणि पुरंदरमध्ये या तालुक्यांमध्ये चुरस आहे.
शिरूरचा विचार केल्यास भाजपचे राजेंद्र गावडे, कांचन सांडभोर आणि सुनिता कड विजयी झाल्या आहेत. यातील राजेंद्र गावडे यांचे नाव गटनेतेपदासाठी पुढे करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. पुरंदरमधून अजय कैलास इंगळे, हरिभाऊ लोळे यांनी विजय मिळवला आहे. यांच्यातील एकाच नाव देखील गटनेते पदासाठी पुढे करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे. माजी आमदार संजय जगताप गटनेतेपदासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
भोरमधून पोपट सुके आणि माझी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे यांचा देखील विजय झाला आहे. भाजपाच्या गटनेतेपदासाठी स्वरूपा थोपटे यांचेही नाव वरिष्ठांकडे पाठवले असून त्यासाठी थोपटेंनी देखील आपली ताकद लावली आहे. अनेक दशके घरामध्ये आमदारकी असलेल्या थोपटे गत विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरचा दीड वर्षांचा वनवास संपून त्यांच्या घरात जिल्हा परिषदेचे पद येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितलं की, जिल्हा परिषदेबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मधील युतीबाबत, सभापती पदाची निवड आणि गटनेतेपदाबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून तो अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. गटनेते पदासाठी ३ नाव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आली असून त्यातील एक नाव पुढील दोन दिवसांमध्ये निश्चित करण्यात येणार आहे. तो निर्णय सर्वस्वी वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहे.
1. जिल्हा परिषद अध्यक्ष निवड कधी होणार आहे?
अध्यक्ष निवड 18 तारखेला होणार आहे.
2. भाजपचा गटनेता का महत्त्वाचा आहे?
जिल्हा परिषदेमध्ये गटनेता होणारी व्यक्तीच विरोधी पक्षनेते पद भूषवणार आहे.
3. गटनेते पदासाठी कोणते तालुके आघाडीवर आहेत?
भोर, शिरूर आणि पुरंदर तालुके आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.
4. स्वरूपा थोपटे यांची भूमिका काय आहे?
त्यांचे नाव भाजप गटनेते पदासाठी वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहे.
5. थोपटे कुटुंबासाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे?
गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा सत्तास्थानी येण्याची संधी या निवडीमुळे मिळू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.