Sangram Thopte: भोरच्या नादात संग्राम थोपटेंचं राजगडकडं दुर्लक्ष! शंकर मांडेकरांनी साधली संधी; राष्ट्रवादीचं दमदार कमबॅक

Sangram Thopte: राजगड तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा परिषद गटांत व पंचायत समितीच्या सत्तेपासून दूर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार कमबॅक केले आहे.
BJP leader Sangram Thopte
BJP leader Sangram Thopte Sarkarnama
Published on
Updated on

Sangram Thopte: राजगड तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा परिषद गटांत व पंचायत समितीच्या सत्तेपासून दूर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार कमबॅक केले आहे. आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या तीन जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर भाजपला पंचायत समितीच्या एका जागेवर समाधान मानावे लागले असल्याने माजी आमदार संग्राम थोपटे यांचा राजगड तालुका म्हणजे बालेकिल्ला ढासळला असल्याची चर्चा तालुक्यामध्ये रंगली आहे.

BJP leader Sangram Thopte
Rahul Kul: अजितदादांनी खासगीत दिलेला उमेदवारीचा शब्द! भाजप आमदार राहुल कुल यांचा तब्बल 35 वर्षांचा बालेकिल्ला राष्ट्रवादीकडून काबीज

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार शंकर मांडेकर यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विकास कामाच्या जोरावर राजगडमध्ये राष्ट्रवादीला एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यास यश मिळाले आहे. मिळालेले यश तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित करण्यात आले आहे. तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन्ही गटांमध्ये व पंचायत समितीच्या चार गणांमध्ये राष्ट्रवादी व भाजप अशी प्रमुख लढत पाहावयास मिळाली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शिवसेना, काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी व पक्ष उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

BJP leader Sangram Thopte
Krishna Sugar Factory: पश्चिम महाराष्ट्रात आता सर्वात मोठ्या ‘कृष्णा’ कारखान्याचा धुरळा! भोसलेंविरोधात चव्हाण, मोहिते, कदम, पाटील, उंडाळकर येणार एकत्र?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीवरून अंतर्गत नाराजी नाट्य झाल्याने विंझर गटामध्ये पक्षांतर केलेल्या व वेल्हे बुद्रुक गटामधून अपक्ष निवडणूक लढविलेल्या उमेदवारांचा पराभव झाला. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आमदार शंकर मांडेकर यांनी राजगड तालुक्यामध्ये प्रचाराचा झंझावात ठेवत नाराज झालेल्या मात्र उमेदवारी न केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची समजूत घालत कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभागी करून घेण्यात यश मिळाले होते.

BJP leader Sangram Thopte
Sangli News: सांगलीत चंद्रकांतदादा वर्षभर प्रचंड धावले, नेत्यांची फौज भाजपमध्ये आणली... पण शांत जयंत पाटील पुरून उरले!

माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काही महिन्यापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजगड तालुक्यातील बहुतांशी कार्यकर्ते हे भाजपमध्ये गेले होते. संग्राम थोपटेंबरोबर गेलेल्या ज्येष्ठांना सुद्धा उमेदवारी दिली गेली नसल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूर अनेकांना जाणवत होता. भाजपने पानशेत गणाची एक जागा वगळता सर्वच ठिकाणी नवख्या उमेदवारांना संधी दिली होती.

BJP leader Sangram Thopte
Top 10 News: भाजपने फिनिक्स भरारी घेत उलथवली काँग्रेसची 20 वर्षांची सत्ता ते पुणे ZP च्या अध्यक्षपदासाठी 5 निकष

माजी मंत्री अनंतराव थोपटे व आमदार संग्राम थोपटे यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजगड तालुका नेहमीच थोपटे यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला असल्याचे चित्र आहे मात्र असे असताना प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड तालुक्यात सभा न घेतल्याने याचा फटका भाजपच्या सर्वच उमेदवारांना बसला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com