BJP-NCP Alliance : उपमहापौरपदावरून नवा ट्विस्ट? भाजप-राष्ट्रवादी युतीच्या चर्चांवर शहराध्यक्षचं मोठं वक्तव्य; 'तसा प्रस्ताव आल्यास विचार करू...'

NCP Politics in pune municipal corporation : पुणे महापालिकेत राज्याप्रमाणेच भाजप-राष्ट्रवादीची युती होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच खळबळ उडाली आहे. राज्यात खांद्याला खांदा लावून सत्तेचा गाडा हाकणारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता पुणे महापालिकेतही एकत्र येणार, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी खासदारांने "राज्यात एकत्र, मग महापालिकेत का नाही?" असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीला उपमहापौरपद पदरात पाडून घेत सोबत जाण्याचा एक विशेष प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करत या सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

माजी खासदाराचे वक्तव्य हे वैयक्तिक मत

माजी खासदारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, असा थेट खुलासा पुणे शहराध्यक्ष सुनील अण्णा टिंगरे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका ही केवळ पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अधिकृत पदाधिकारी यांच्यामार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे या विधानाचा आणि पक्षाच्या भूमिकेचा काहीही संबंध नसल्याचे टिंगरेंनी स्पष्ट केले.

Pune Municipal Corporation
NCP Politics : सुनेत्रा पवार यांना आव्हान देण्यामागे कोणाचा ब्रेन? सच्चिदानंद सिंह यांच्या आडून राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा डाव?

"पुणेकरांच्या प्रश्नांसाठी ठाम"

सुनील टिंगरे पुढे म्हणाले, महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसण्याचा कौल दिला होता. त्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या निर्णयानुसार निलेश निकम यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. आणि निवडणुकीवेळीचे आश्वासन पक्षाच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि जी उद्दिष्ट ठेवण्यात आली होती ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व निवडून आलेले सदस्य प्रयत्न करत असल्याचे टिंगरे म्हणाले.

अद्याप कोणताही निर्णय नाही!

भाजपसोबत महापालिकेत सत्तेत सहभागी होण्याच्या आणि उपमहापौर पदाच्या डीलबाबत विचारले असता, टिंगरे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ते म्हणाले, "अद्याप असा कोणताही निर्णय पक्षात झालेला नाही आणि यावर कोणतीही चर्चाही झालेली नाही. पक्षाचे नगरसेवक आपापल्या भागात विकासकामांसाठी सक्रिय आहेत.

भाजपसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या आमच्या पातळीवर नाही. जर भविष्यात वरिष्ठ पातळीवर काही निर्णय किंवा चर्चा झाली, तर तो पक्षाचा वरिष्ठ स्तरावरील अधिकार असेल." तसेच वरिष्ठ पातळीवर काही निर्णय होतील आणि तसा काय प्रस्ताव आला तर विचार करू असं देखील टिंगरे म्हणाले.

Pune Municipal Corporation
Raigad Shivsena Vs NCP Politics : 'विश्वासघाताची किंमत चुकवावी लागले'; एकनाथ शिंदेंचा शिलेदार राष्ट्रवादीत तटकरेंबरोबर येताच शिवसेनेवर गुरगुरला!

पदाधिकाऱ्यांची कोंडी?

राज्यात एकत्र असल्याने महापालिकेत भाजपबरोबर न जाण्याबाबत थेट भूमिका घेणे देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जोखमीचं वाटत आहे. तसेच सध्य परिस्थितीला भाजपसोबत जाण्याची उघड भूमिका देखील घेतल्यास राजकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com