Pune Crime News : 'लोकं वाईटच असतात तू दुर्लक्ष कर, गावी निघून जा'. ...'

Crimes against women : स्वारगेट बस स्थानकात बलात्कार झालेल्या मुलीला मित्राने योग्य सल्ला दिल्यानेच पिडीत तरूणी हडपसरपर्यंत गेलेली परत आली.
Pune Rape Case
Pune Rape Casesarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला आहे. कोयता गँगची दहशत, गाड्यांची तोडफोड आणि मारहाण या सारख्या गुन्हेगारी कारवाया नित्याच्या झाल्या आहेत. त्यातच आज स्वारगेट बस स्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी एका 26 वर्ष तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे पुणेच नव्हे तर सबंध राज्य हादरून गेला आहे. दत्तात्रय रामदास गाडे अस अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नावं असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

मंगळवारी (ता.25) पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास 26 वर्षीय पीडित तरुणी पुण्यातून फलटण येथे गावी निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँड येथे आल्यानंतर ती प्रतीक्षा कक्षातील एका बाकावर बसली होती. यावेळी आरोपीने ती एकटी असल्याचा हेरलं आणि तो त्या ठिकाणी आला. आरोपीने पीडितेची विचारपूस करत ताई तू कुठे चालली आहेस?, असा प्रश्न केला. त्यावर पीडितेने मी फलटण येथे निघाली असल्याचे सांगितलं.

Pune Rape Case
Kolkata Rape and Murder Case : क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या, तरीही दोषी संजय रॉय फाशीच्या शिक्षेपासून कसा वाचला?

त्यावर आरोपीने फलटणची बस तर तिकडे लागली आहे, तू इथे काय करतेस? असा प्रश्न त्या तरुणीला केला त्यावर ती तरूणी साताऱ्याला जाणाऱ्या बस इथेच लागतात असं म्हणाली. त्यावर आरोपीने ती बस रात्रीची लेट झाली आहे. दुसरीकडे लागली असून तू जा पटकन मी तुला बसवतो असं सांगितलं. गोड बोलून आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीला शिवशाही बस गाडी क्रमांक MH 06 BW 0319 या गाडीमध्ये नेलं.

गाडीमध्ये पूर्ण अंधार असल्याने पीडितेला संशय आला. मात्र आरोपी गाडेने रात्री उशीर झाला आहे. त्यामुळे प्रवासी झोपलेले असतील म्हणून लाईट बंद केलेत, असं सांगून तरुणीला भुलवल. तू वर चढ आणि टॉर्च लावून बघ, असे गोड बोलून बसमध्ये घेऊन गेला. ती तरूणी बसमध्ये चढताच त्याने एसटीचा दरवाजा लावून घेतला आणि पीडितेसोबत अतिप्रसंग करून पसार झाला.

Pune Rape Case
Swargate Shivshahi Incidence : 'पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी घटना..', अंधारेंनी व्यक्त केला संताप

या प्रसंगानंतर घाबरलेल्या अवस्थेत ती तरुणी स्वारगेट बस स्थानकात गेली. काय करावे? हे तिला न सुचल्याने त्या तरुणीने स्वारगेट बस स्थानकातील एका व्यक्तीला आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. मात्र तो व्यक्ती तिला म्हणाला, 'लोकं वाईटच असतात तू दुर्लक्ष कर आणि आपल्या गावी निघून जा'. त्यानंतर पीडित तरुणी पुढची गाडी पकडून आपल्या गावी निघून गेली.

प्रवासादरम्यान तिने घडलेला सगळा प्रकार फोन करून आपल्या मित्राला सांगितला. त्यानंतर मित्राने या तरुणीला पोलिसात तक्रार दाखल करायला सांगितली. प्रवासात ती हडपसरपर्यंत पोहोचली होती. मित्राच्या सांगण्याप्रमाणे ती तिथेच उतरली आणि पुन्हा स्वारगेटला अली आणि स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये सविस्तर तक्रार दाखल केली.

Pune Rape Case
Vasant More Video : मोठी बातमी! वसंत मोरे यांच्याकडून स्वारगेट एसटी स्थानकात तोडफोड, म्हणाले, शेकडो कंडोम पडलेत...

या घटनेनंतर आता संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. आरोपीला कठोरात कठोर शासन होण्याची मागणी सर्व स्तरातून केली जातेय. दरम्यान, पिडीत तरुणीला ससुन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार देखील सुरु असून तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. या वैद्यकीय चाचणीचा रिपोर्ट संध्याकाळपंर्यत येण्याची शक्यता आहे. तर आज संध्याकाळपर्यंत तिला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com