Bogus School : सर्वात मोठी बातमी! अ‍ॅडमिशनला धावाधाव करणाऱ्या पालकांना पुणे महापालिकेचा इशारा, 13 बोगस शाळांची यादी जाहीर

PMC Warning Bogus School : सध्या शाळांच्या परीक्षा झाल्या असून आता पालकांकडून पाल्यांसाठी चांगल्या शाळांचा शोध घेतला जात आहे.
Bogus School
Bogus Schoolsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पुणे महापालिकेने 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली

  2. ऍडमिशनच्या काळात पालकांना सतर्क राहण्याचा इशारा

  3. प्रसिद्ध शाळांमध्ये प्रवेश न मिळाल्याने पालक पर्याय शोधत आहेत

Pune News : सध्या शाळांच्या परीक्षा झाल्या असून निकाल देखील लागले आहेत. त्यामुळे पालकांची मुलांसाठी चांगली शाळा निवडण्याची लगबग सुरू आहे. पुण्यातील प्रसिद्ध शाळांमध्ये अ‍ॅडमिशन साठी पालकांची रीग लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. या मोठ्या शाळांमध्ये अ‍ॅडमिशन मिळत नसल्याने पालक सध्या इतर शाळांकडे वळताना पाहायला मिळत आहे. मात्र या पालकांसाठी खबरदारीच्या सूचना पुणे महापालिकेने जारी केल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शहरातील १३ शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, २०२६-२७ या आगामी शैक्षणिक वर्षासाठी पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शाळांना शासनाची कोणतीही अधिकृत मान्यता नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असून, पालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Bogus School
PMC News: श्रीनाथ भीमाले यांची अतिरिक्त आयुक्तांना ‘बैठकीत बघून घेतो’ची धमकी? सर्वसाधारण सभेत काय घडलं

शिक्षण विभागाने पालकांना आवाहन करताना स्पष्ट केले आहे की, मुलांच्या भविष्यासाठी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची शासन मान्यता आणि आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. कोणतीही घाई न करता सर्व बाबींची पडताळणी करूनच प्रवेशाचा निर्णय घ्यावा, असेही विभागाने नमूद केले आहे. ही माहिती व जनसंपर्क कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

अनधिकृत शाळांची यादी :

१. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडियम स्कूल - बिबवेवाडी, पुणे.

२. महात्मा गांधी प्रशाला - येरवडा, पुणे.

३. टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब - कोंढवा खुर्द, पुणे.

४. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल - कोंढवा बुद्रुक, पुणे.

५. इमॅन्युअल पब्लिक स्कूल - हडपसर, पुणे.

६. आकांक्षा अकॅडमी स्कूल - लोहगाव, पुणे.

७. एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आर्यन पब्लिक स्कूल - नऱ्हे, पुणे.

८. लेगसी हाय स्कूल - कोंढवा बुद्रुक, पुणे.

९. शिबली नोमानी इंग्लिश मिडियम स्कूल - कोंढवा बुद्रुक, पुणे.

१०. ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल - उंड्री, ता. हवेली, पुणे.

११. ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल - कौसरबाग, कोंढवा, पुणे.

१२. ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल - आंबेगाव बुद्रुक, पुणे.

१३. आर्यन वर्ल्ड स्कूल - उंड्री, पुणे.

Bogus School
टक्केवारीवरून जुंपली? भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये राडा Rohini Chimte, Pmc, Pune

FAQs :

1. पुणे महापालिकेने काय जाहीर केले आहे
13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे

2. पालकांना का इशारा देण्यात आला आहे
अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये म्हणून

3. हा मुद्दा कधी समोर आला
शाळांच्या प्रवेश प्रक्रियेच्या काळात

4. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास काय धोका आहे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि प्रमाणपत्रावर परिणाम होऊ शकतो

5. पालकांनी काय काळजी घ्यावी
शाळेची मान्यता तपासूनच प्रवेश घ्यावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com