Maratha Reservation News : आमच्या हातात सत्ता द्या; आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटांत सोडवतो : महादेव जानकर

Mahadev Jankar देशात छत्रपती शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण सुरू केले. आज त्यांच्याच समाजाला 70 वर्षांनी आरक्षण मागावे लागते हे अपयश कोणाचे, असा प्रश्नही महादेव जानकर यांनी उपस्थित केला.
RSP Leader Mahadev Jankar
RSP Leader Mahadev Jankarsarkarnama

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मी आमदार म्हणून माझ्या किंवा राज्य शासनाच्या हातात नाही. तो दिल्लीच्या हातात आहे. मला खासदार करून पाठवा व आमच्या हातात सत्ता द्या. मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटांत सोडवून टाकतो, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

कराड Karad Politics येथे बळीराजा शेतकरी संघटना आणि रासप यांच्या माध्यमातून उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा, याकरिता कराड ते पाटण अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या वेळी महादेव जानकर Mahadev Jankar यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.

महादेव जानकर म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. संसदेत ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे. 2009 साली मी पहिल्यांदा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचा हक्कदार असल्याबाबत पुस्तक लिहिले आहे. तामिळनाडूत 63 टक्के आरक्षण आहे, मग महाराष्ट्रात असे का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित करून जनतेने आता हुशार झाले पाहिजे.

आरक्षणाचा प्रश्न हा मी आमदार म्हणून माझ्या किंवा राज्य शासनाच्या हातात नाही. तो दिल्लीच्या हातात आहे. मला खासदार करून पाठवा. दिल्लीत रासपचे सरकार आणा, पंजाबराव पाटील यांना सातारचे रासपचे खासदार करा. मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटांत सोडवून टाकतो.

आमच्या हातात सत्ता द्या. आमच्याजवळ आज सत्ता आहे का? आम्ही बाहेर आहोत. धनगर समाजालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. देशात छत्रपती शाहू महाराज यांनी प्रथम आरक्षण सुरू केले. आज त्यांच्याच समाजाला 70 वर्षांनी आरक्षण मागावे लागत असल्याची सांगत हे अपयश कोणाचे, असा प्रश्नही माजी मंत्री महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे. Maharashtra Political News

आम्हाला आमचा मार्ग मोकळा

भाजपमधून बाहेर पडणार का, यावर महादेव जानकर म्हणाले, आज चार राज्यात माझ्या पक्षाला मान्यता आहे. भाजपला गरज वाटत असेल तर आम्हाला ठेवल, अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे. मलाच माझी सत्ता आणायची आहे. उद्या कुणाशीही आमची युती होईल. भाजपला आमची गरज नसेल, तर आम्ही काय मागे लागलो आहे का, असा प्रश्न त्यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com