Karad Political News : कराडच्या प्रीती संगमावरून महादेव जानकरांचा सरकारला इशारा

Mahadev Jankar महादेव जानकर म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्य माणसांना राजकारणाची दारे खुली केली. सत्तेचे विकेंद्रीकरण केले.
Mahadev Jankar, Eknath shinde
Mahadev Jankar, Eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Karad Political News : ऊसदर, दूध दराबाबत बळीराजा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे आज कराडमध्ये आले होते. या वेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

महादेव जानकर Mahadev Jankar म्हणाले, यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांनी सर्वसामान्य माणसांना राजकारणाची दारे खुली केली. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे काम केले. तसेच शेतकरीहिताचे निर्णय घेतले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरविण्याचे काम सातारा जिल्हा करत आहे. तसेच शेतकऱ्यांला वीज, रस्ता देण्याचे काम त्यांनी केले.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. सध्या शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार उसाला पाच हजार दर द्यावा, दुधाला शंभर रुपये दर मिळावा, शेतकऱ्याला टोल माफी करावी, अपेक्षा आहे.

एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकत शेतकऱ्यांत असून, जगाचा पोशिंद्याला आज राजकारण्यापुढे भीक मागावी लागत आहे, अशी खंतही जानकर यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण यांना वंदन करून आम्ही मोर्चा सुरू केला आहे. Maharashtra Political News

Mahadev Jankar, Eknath shinde
Satara Shivsena News : सरसकट दुष्काळ जाहीर करा; उद्धव ठाकरे गट शिवसेनेचा मोर्चा

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी प्रीती संगमावरून व्यक्त केली.

Edited By : Umesh Bambare

Mahadev Jankar, Eknath shinde
Karad Political News : मुजावर कॉलनी स्फोटाचा तपास एटीएसकडून करा; बॉम्ब निर्मितीचा नितेश राणेंना संशय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com