Congress News : काँग्रेसच्या मेळाव्याला राहुल पाटलांची दांडी, मालोजीराजेंची अनुपस्थिती; बैठकीचं कारण देत...

Political News : काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला राहुल पाटील यांनी दांडी मारली तर दुसरीकडे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चा रंगली होती.
Congress meeting
Congress meeting Srakrnama
Published on
Updated on

Kolhapur News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील शहर कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा कोल्हापुरमध्ये पार पडला. काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला राहुल पाटील यांनी दांडी मारली तर दुसरीकडे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चा रंगली होती.

काँग्रेसने आयोजित केलेल्या या निर्धार मेळाव्याला माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil), खासदार शाहू महाराज यांच्यासह नेते मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. मात्र, या मेळाव्याप्रसंगी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती गैरहजर होते तर दिवंगत माजी आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांनी मेळाव्याला दांडी मारली.

Congress meeting
Mahayuti Politics : शिंदेंच्या नेत्याला फडणवीसांनी डावललं, मंत्रिपद जाणार? नाराज शिरसाटांना माधुरी मिसाळांनी दिलेल्या 'त्या' उत्तरामुळे चर्चांना उधाण

दुसरीकडे राहुल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार मालोजीराजे नाराज झाल्याची चर्चा आहे. पण आजच्या मेळाव्यात मालोजीराजे छत्रपती येणार असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता. मात्र, त्यांनी देखील दांडी मारल्याने काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे.

Congress meeting
Shirsat vs Misal : भाजप-शिवसेना मंत्र्यांत अधिकारांवरून संघर्ष शिगेला; शिरसाट-मिसाळ आमने-सामने

दरम्यान, दिवंगत काँग्रेसचे (Congress) नेते आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना या संदर्भात संपर्क साधला असता, या बैठकीला आपण येणार नसल्याचे सांगण्यात आले. बैठकीनिमित्त बाहेर असल्याचे कारण फोनवरून देण्यात आले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मालोजीराजे छत्रपती हे अचानक आलेल्या कामानिमित दिल्लीला गेल्याचे समजते.

Congress meeting
Sudhir Mungantivar cabinet return : सुधीरभाऊ मंत्रिमंडळात कधी परतणार? शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले मोठे संकेत

दरम्यान, या बैठकीत आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरविण्यात आली. त्यासोबतच महानगरपालिका निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला काँग्रेसचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Congress meeting
Kailas Gorantyal joins BJP : 'आईना बनने का हर्जाना तो भरना है मुझे'; शेरोशायरी करत काँग्रेसचा 'कैलास' भाजपच्या वाटेवर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com