Kolhapur Politics :विधान परिषदेची तयारी करणाऱ्या सतेज पाटलांना धक्का; काँग्रेसचे निष्ठावंत पीएन पाटलांच्या चिरंजीवाचा भाजपप्रवेश निश्चित

Rahul Patil Will Join BJP : काँग्रेसचे दिवंगत नेते आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राजकीय वारसदार ठरलेले पुत्र राहुल पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर भाजपकडून राहुल पाटील यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या.
Rahul Patil
Rahul PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 12 May : गेली अनेक दशके काँग्रेससोबत निष्ठावंत असणारे करवीरमधील पाटील घराणे पक्षाची साथ सोडण्याची चिन्हे आहेत. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त 23 मेनंतरचा असल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात रंगली आहे. भोगावती सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भाजप पक्षप्रवेशाची चर्चा सुरू असली तरी यामागे अनेक राजकीय डावपेच दडले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी राहुल पाटलांना जय श्रीराम म्हणत कमळ हाती घेण्याचा आग्रह केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राहुल पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यास विधान परिषदेची तयारी करणारे माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. त्यांच्याकडून राहुल पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण सत्तेचे फायदे राहुल पाटील यांचा मार्ग प्रशस्त करण्याची शक्यता अधिक आहे.

काँग्रेसचे दिवंगत नेते आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राजकीय वारसदार ठरलेले पुत्र राहुल पाटील (Rahul Patil) यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर भाजपकडून राहुल पाटील यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. भोगावती सहकारी साखर कारखाना, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ, गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, सूतगिरणीच्या माध्यमातून करवीर विधानसभा मतदारसंघात पाटील गटाचा दबदबा कायम आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील गट जिल्हा परिषद आणि गोकुळच्या निमित्ताने महत्त्वाचा ठरू शकतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. भाजपकडून इतर पक्षातील निष्ठावंतांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात भाजप स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राजकीय तालमीत तयार झालेले मल्लच भाजपकडून शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Rahul Patil
Jaykumar Gore : ‘इथून पुढं निवडणुकीला उभं राहणार नाही; पण मिटवून घ्या,’ असा निरोप येतोय : ‘त्या’ प्रकरणाबाबत जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा विचार केल्यास करवीर विधानसभा मतदारसंघात 11 जिल्हा परिषद गट आहेत. मागील निवडणुकीचा विचार केल्यास सर्वत्र पाटील गटाची सत्ता होती, त्यामुळे राहुल पाटील यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यास जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष करण्यासाठी मोठा हातभार लागू शकतो.

Rahul Patil
Maharashtra Politic's : शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत गडकरींना सांगितला ‘सहकार बचाव’चा राजमार्ग...

गेल्या महिनाभरापासून राहुल पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल चर्चा सुरू आहेत. राहुल पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतले आहेत. निष्ठावंत पाटील गटासोबत असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्यास विरोध दर्शवला आहे. पण, काही कार्यकर्त्यांनी सहकारी संस्था आणि सामाजिक संस्थांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी सत्तेची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे भाजपचा पर्याय राहुल पाटील यांनी निवडावा, असा आग्रह केला गेला आहे. येत्या 23 मे रोजी पी. एन. पाटील यांचा स्मृतिदिन आहे, त्यानंतरच राहुल पाटील हे भाजपमध्ये जाण्याचा मुहूर्त शोधणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com