Jaykumar Gore : ‘इथून पुढं निवडणुकीला उभं राहणार नाही; पण मिटवून घ्या,’ असा निरोप येतोय : ‘त्या’ प्रकरणाबाबत जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट

Jaykumar Gore Defamation Case : ‘सरेंडर करणारा कधीही जिंकलेला नाही, हे तपासून बघा. शकुनीमामा जिंकला का? फलटणचा शकुनीमामाही जिंकला नाही, मला राजकारणातून संपवता संपवता, त्यांनाच संपावं लागलं. त्यांना घरी बसावं लागलं.’
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Satara, 12 May : हा जयकुमार गोरे कधीही कोणापुढे झुकला नाही, वाकला नाही. अनेक अडचणी आल्या. पण, अडचणींवर मात करून संकटाच्या छातीवर उभा राहून हा जयकुमार गोरे पुढे गेला. पण, जाता जाता अनेकांना जेलमध्ये जायची भीती वाटायला लागली. कोण म्हणतंय माझं वय एवढं आहे, मला पोलिस ठाण्याला कशाला बोलावताय. माझी परिस्थिती खूप गंभीर आहे. इथूनं पुढे निवडणुकीला उभंच राहत नाही. पण मिटवून घ्या, असा निरोप दिला जात आहे, असा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या बदनामीप्रकरणी केला आहे.

‘सरेंडर करणारा कधीही जिंकलेला नाही, हे तपासून बघा. शकुनीमामा जिंकला का? फलटणाचा शकुनीमामाही जिंकला नाही, मला राजकारणातून संपवता संपवता, त्यांनाच संपावं लागलं. त्यांना घरी बसावं लागलं,’ असा हल्ला जयकुमार गोरे यांनी नाव न घेता विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावर चढवला.

दहिवडी येथील कार्यक्रमात बोलताना राज्याचे ग्रामविकस मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची गाडी सुसाट सुटली होती. विरोधकांवर त्यांनी नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, बाबांनो, आता यमानं जीआर काढला आहे. आता कोर्टात-बिर्टात जायचं मी बंद केलं आहे. ह्यो स्मशानभूमीत जायच्या आधी त्याला भेटल्याशिवाय सोडणार राहणार नाही. त्यामुळे फलटणकरांपासून सगळ्यांचा हिशेब आता होतो आहे. कधीतरी या गोष्टी समोर येतात, कधीतरी हे घडायला लागतं.

मी राजकारणात पहिल्या दिवसांपासून संघर्ष केला आहे. जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला. पहिल्यांदा आमदार झालो, त्यावेळीही संघर्ष केला. अशी एक वेळ नाही की, मी संघर्ष केला नाही. निवडणूक लागली आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही, असं कधी घडलचं नाही. या सगळ्या परिस्थिती आपण अनुभवल्या आहेत. पण सगळ्या परिस्थितीतून त्या परमेश्वराने मला मार्ग काढून दिला आणि लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, असेही गोरे यांनी नमूद केले.

Jaykumar Gore
Nitin Gadkari : कर्ज मंजूर करायला सांगणाऱ्या गडकरींना पत्नीचा सवाल; ‘आमचे पैसे डुबले, तर तुम्ही जबाबदार राहणार का?’

गोरे म्हणाले की, आता बघताय तुम्ही, कोण कुठं गेलं तरी लढायची ताकद या जयकुमार गोरेमध्ये आहे. सगळ्या संकटाचा सामना करण्याची ताकद या जयकुमारमध्ये आहे. हा जयकुमार गोरे माण खटाव मातीचा सुपुत्र आहे. कधी कोणापुढे झुकला नाही आणि वाकला नाही. प्रसंग कसाही असू दे. कधीच झुकला नाही. कदाचित मी बारामतीसोबत तडजोड केली असती तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मला राजकारणात झालेला त्रास कमी झाला असता.

मी कधी साताऱ्याशी, फलटणशी तडजोड केली असती तर माझा राजकारणातला त्रास कमी झाला असता. पण, मी माझ्या माण खटावच्या मातीला स्वाभिमानाने उभा करू शकलो नसतो. मी माझ्या माणसाला सन्मानाने उभा करू शकलो नसतो. माझ्या माण खटावला पाणी देऊ शकलो नसतो. अनेक अडचणी आल्या. पण अडचणीवर मात करून संकटांच्या छातीवर उभा राहून हा जयकुमार गोरे पुढे गेला. पण जाता जाता अनेकांना जेलमध्ये जायची भीती वाटायला लागली, असेही गोरे यांनी सांगितले.

Jaykumar Gore
Maharashtra Politic's : शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत गडकरींना सांगितला ‘सहकार बचाव’चा राजमार्ग...

गोरे म्हणाले, कोण म्हणतंय माझं वय एवढं आहे, मला पोलिस ठाण्याला कशाला बोलावताय? माझी परिस्थिती खूप गंभीर आहे. कोण कुठून कुठून निरोप देतोय. मी इथून पुढे निवडणुकीला उभंच राहत नाही. पण एकदा मिटवून घ्या. कोण देवेंद्र फडणवीस यांचे पाय दाबतोय, पाय चाटतोय. मला वाचवा हो. हा जयकुमार गोरे कसल्याही परिस्थितीत कोणाला मदत मागायला गेला नाही. परिस्थितीशी दोन हात करत लढत राहिला. पण, माझी बाजू सत्याची होती. सरेंडर करणारा कधीही जिंकलेला नाही, हे तपासून बघा. शकुनीमामा जिंकला का? फलटणाचा शकुनीमामाही जिंकला नाही, मला राजकारणातून संपवता संपवता, त्यांनाच संपावं लागलं. त्यांना घरी बसावं लागलं. माझी बाजू सत्याची आहे. म्हणून मी आजही स्वाभिमााने पुढे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com