Waghya statue : 'औरंजेबच्या कबरीपासून वाघ्या कुत्र्याच्या समाधीपर्यंत, फक्त जातीय वळण...'; होळकरांच्या वंशजानं फटकारलं

Bhushansinghraje Holkar On Sambhaji Raje : गेल्या दोन एक दिवसापासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून वाद निर्माण झाला आहे. हे शिल्प हटवावे, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यावरून आता नाव निर्माण झाला असून होळकरांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी यावर पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे.
Bhushansinghraje Holkar And Sambhaji Raje
Bhushansinghraje Holkar And Sambhaji Rajesarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यात सध्या औरंगजेब कबर, झटका-हलाल हे वाद चर्चेत आहेत. यातच दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने देखील पाच वर्षांनी डोकवर काढलं असून राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगडावरून नवा मुद्द्या उपस्थित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथे असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केल्याने मराठे-ओबीसी असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाजीराजे यांनी या समाधीचा इतिहासात कुठलाही संदर्भ नसल्याने ती हटवावी, अशी मागणी केली आहे. तर याबाबत अल्टीमेटमही दिला आहे. त्यांच्या या अल्टीमेटमला बजरंग दलाचा सपोर्ट असून ती समाधी कधी हटवणार असा सवाल बजरंग दलाने मुख्यमंत्री फडणवीस यांना केला आहे. आता याच मुद्द्यावरून होळकरांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. त्यांनी राज्यातलं वातावरण कोणताही विषय घेऊन दुषीत करणं सुरू असल्याचं म्हटलं आहे.

वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून भूषणसिंहराजे होळकर यांनी चिघळलेल्या मुद्द्यात अहिल्याबाई होळकर यांचे वंशज उडी घेतली आहे. आज (ता.27) त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे. सध्या राज्यात अनेक प्रश्न असून जनता त्रस्त आहे. पण सध्या या प्रश्नांना बगल देऊन समाजातून तेढ निर्माण होणाऱ्या गोष्टी उकरून काढल्या जातातय. औरंगजेब कबरीनंतर आता वाघ्या कुत्र्याचा विषय घेऊन राज्यातील वातावरण दुषीत केलं जातयं, असेही त्यांनी म्हटलं आहे.

तर ऐतिहासिक विषय हे कधीच जातीविषयक नसतात तर ते तत्कालीन परिस्थितीनुसार घेतलेले असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाच्या जोरावर माणसे निवडली होती. जातीच्या जोरावर नाही, असे म्हणत नाव न घेता नीतेश राणेंना टोला लगावला आहे. वाघ्या प्रकरण समोर आलं असून हे प्रकरण शिवकालीन आहे. त्यामुळे आता यावर बोलणं योग्य नाही. पण सध्या सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून बोलावं लागत असल्याचे भूषणसिंहराजे होळकर यांनी सांगितलं.

Bhushansinghraje Holkar And Sambhaji Raje
Ajit Pawar On Waghya Dog Statue : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी, अजितदादा म्हणतात, 'का जुने विषय...'

यावेळी त्यांनी सर्व बाजू समजून घेताना दोन्ही बाजू ऐकून, दोन्ही पक्षांच्या बाजू समजून घेतल्या पाहिजेत. तर राज्यातील जनतेनं शासनाबरोबर राहिलं पाहिजे, असेही त्यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. तर होळकरांनी रायगडावरच्या समाधीसाठी देणगी दिली. तेव्हापासून होळकरांचा येथे सहभाग आहे. तर वाघ्या कुत्र्याचा प्रकरण शिवकालीन आहे. समाधीचा जिर्णोद्धारावेळी निधी इंदौरहून आला. त्यामुळेच त्या स्मारकाबरोबर आमच्या समाजाच्या भावना आहेत.

या भावनेचा अनादर करणारे कोणी स्टेटमेंट देत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशाराच भूषणसिंहराजे होळकर यांनी दिला आहे. तर कोणाचे काही राजकीय हेतू असतील, कोणाचे स्वतःचे मतं असेल, त्यात मला पडायचं नाही, पण कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत आणि सामंजस्याने यावर चर्चा होवून तोडगा निघावा एवढंच आपलं मत असल्याचेही भूषणसिंहराजे होळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी, काल एका पत्रकार परिषदेत होळकर इंग्रजांना घाबरत होते, असं ऐकलं. मात्र इंग्रजांबरोबर कधी होळकरांनी सेटलमेंट केलेले नाही. त्यामुळे असं वक्तयव करणाऱ्यांनी आधी अभ्यास करावा, त्यांच्या अशा सेटलमेंटवरून त्यांचा किती अभ्यास आहे समोर येत असल्याचेही ते म्हणाले. तर भारतामध्ये शेवटपर्यंत इंग्रजांच्या विरोधातील लढा हा महाराजा यशवंतराव होळकरांनी दिला होता.

Bhushansinghraje Holkar And Sambhaji Raje
Sambhaji Bhide: भिडे गुरुजींनी संभाजीराजेंचा दावाच ठरवला खोटा; म्हणाले, 'रायगडावरील वाघ्या कुत्र्या'ची कथा...

1818 पर्यंत होळकर यशवंतराव होळकर आणि त्यानंतर वयाच्या 19 व्या वर्षी मल्हारराव होळकरांनी इंग्रजांच्या विरोधात रणांगणात लढा दिला होता. त्याच लढाईत तुळसाबाई महाराणी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सेटलमेंट करून होळकरांनी कधीही इंग्रजांच्या बरोबर तह केलेला नाही. होळकर इंग्रजांना घाबरतात हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. ज्यांनी कोणी हे वक्तव्य केलं आहे, त्यांना आता विचारावं वाटतं की तुमचा इतिहासाचा अभ्यास किती आहे? यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करू नका, असा इशारा संभाजी ब्रिगेडला असल्याचे असं भूषणसिंहराजे होळकर यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com