Bhushansingh Holkar News : वाघ्या कुत्र्याचा पुतळा पाडू, ही भूमिका सहन करणार नाही! होळकरांनी दिला इशारा

Raigad Fort Historical Monument Dispute Waghya Statue Removal : वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादावर होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 Waghya Statue
Waghya StatueSarkarnama
Published on
Updated on

Pune News : रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस असे ऐतिहासिक पुरावे नसल्याने ते शिल्प तिथून हलवावे, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे. मात्र यानंतर या शिल्पाच्या वादाला जातीय वळण दिलं जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना होळकर म्हणाले, रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत सध्या महाराष्ट्रामध्ये वाद होत असून त्याला जातीय रंग दिला जात आहे. या शिल्पाचा मुद्दा हा कोणीही जाती अस्मितेचा मुद्दा करू नये. काही संघटना आतताईपणे तो पुतळा पाडू, तो पुतळा काढून टाकू, अशी भूमिका घेत आहेत. मात्र अशा आतताईपणाची भूमिका कोणत्याही संघटनेने घेऊ नये, ते आम्ही सहन करणार नाही, असं होळकर म्हणाले.

 Waghya Statue
Beed News : अंजली दमानियांच्या आक्षेपाची अजित पवारांकडून दखल; बीडमधील बिंदूनामवलीची एका महिन्यात चौकशी करणार!

याबाबत संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करावी, या समितीमध्ये दोन्ही बाजूंच्या लोकांना समाविष्ट करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी करणार असल्याचं होळकर यांनी सांगितलं.

पुतळ्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी 31 मेचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. मात्र, 31 मेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 जयंती आहे. ही जयंती सबंध देशभर साजरी करण्यात येणार असून या जयंती दिवशी जर कोणत्याही संघटनेकडून जयंतीला गालबोट लावणारा प्रकार घडल्यास तो कदापि सहन करणार नाही, असा इशारा देखील भूषण होळकर यांनी दिला.

 Waghya Statue
Maharashtra Assembly: अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर समित्यांच्या प्रमुखांची नावे जाहीर; रांजळे, राणा यांच्यावर महत्वाची जबाबदारी

काल एका पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी म्हटलं, होळकर इंग्रजांना घाबरले, म्हणून होळकरांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी पैसे दिले. मात्र त्यांना मला सांगायचंय की, होळकर घराणे शेवटपर्यंत इंग्रजासोबत लढले, त्यामुळे ज्याने हे आकलन केलं, त्याचा अभ्यास किती, हे मला विचारायचं असल्याचे होळकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com