Video Raj Thackeray : राज ठाकरेंचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'मनोज जरांगे यांच्या आडून...'

Raj Thackeray Accusation Uddhav Thackeray sharad pawar : मी मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक काहींनी प्रसिद्ध केल्या. 2006 पासून आमची भूमिका एकच राहिली आहे. आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिले, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या दौऱ्याला मराठा आंदोलक विरोधक करत आहेत. बीडमधील दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीवर मराठा आंदोलक आणि उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी केली. या सगळ्यावर राज ठाकरे यांनी आज (शनिवारी) छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे थेट नाव घेत गंभीर आरोप केले.

'महाराष्ट्रात जातीचे राजकारण करत माथी भडकवली जात आहेत. माझ्या संपूर्ण दौऱ्यात जरांगे पाटील यांचा काही संबंध नव्हता. पण त्यांच्या मागून शरद पवार-उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत', असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले, मी सोलापूरमध्ये बोललो होतो. मात्र, मी मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक काहींनी प्रसिद्ध केल्या. 2006 पासून आमची भूमिका एकच राहिली आहे. आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिले. माझं आजही मत आहे की महाराष्ट्राला आरक्षणाच्या गरज नाही. महाराष्ट्रात उद्योगधंदे, नोकऱ्या काढून बघा नोकऱ्यांचा कोटा नीट वापरला तर आरक्षणाची गरज वाटणार नाही.

Raj Thackeray
Video Devendra Fadnavis : "माझ्या अटकेसाठी चारवेळा प्रयत्न, पण...", फडणवीसांचा खळबळजनक दावा

मोदींकडे आरक्षण का नाही मागितले?

नरेंद्र मोदी हे गेली दहा वर्ष पंतप्रधान होते. ते बारामतीमध्ये आले तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या बोटाला पकडून राजकारणात आलो असे म्हटले होते. जर तसं असेल तर शरद पवारांनी नरेंद्र मोदींकडे मराठा आरक्षणासाठी मागणी का केली नाही. मोदींसोबत उद्धव ठाकरे हे पाच वर्ष सत्तेत होते. मग त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी का केली नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

...नादी लागू नका

मनोज जरांगे-पाटील यांच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरे यांना राजकारण करायचे आहे. जातीमध्ये विद्वेष पसरवून यांना राजकारण करायचे आहे. मराठा समाजाने, ओबीसी समाजाने, इतर जातींनी यांच्या नादी लागू नये, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
BJP Vs Mahavikas Aghadi : 'महाविकास आघाडी लवकरच फुटणार!'; भाजप नेत्याचा सर्वात मोठा दावा, ठाकरेंनाही टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com