Rajan Patil : राजन पाटलांनी उमेश पाटलांचे चॅलेंज किरकोळीत काढले; ‘मीच काय माझा छोटा नातूही मोहोळ, नरखेडलाच काय तुम्ही सांगाल तेथे येईल’

Mohol Political News : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या आव्हानाला माजी आमदार राजन पाटील यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, ‘‘मी नव्हे, माझा छोटा नातूसुद्धा मोहोळ-नरखेडला येईल,’’ असे सांगत आव्हान मोडून काढले.
Rajan Patil-Umesh Patil
Rajan Patil-Umesh PatilSarkarnama
Published on
Updated on

उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांना अनगर सोडून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले, हरलो तर राजकारण सोडेन असे जाहीर केले होते.

राजन पाटील यांनी या आव्हानाला प्रत्युत्तर देत चॅलेंज किरकोळीत काढले, म्हणाले की “मीच काय माझा नातूही मोहोळ-नरखेडला येईल.”

भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील वाद वाढला असून, राजन पाटील यांनी आपण पदासाठी काम करत नाही, असे स्पष्ट केले.

Solapur, 19 October : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच माजी आमदार राजन पाटील यांना अनगर सोडून कोणत्याही गटातून निवडणूक लढवून दाखवावी. हरलो तर राजकारण सोडेन, असे आव्हान दिले होते. तसेच, माझ्यावर अनगरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा तुम्हालाही मोहोळ, नरखेडमध्ये यायचंय, असे चॅलेंज त्यांनी दिले होते. त्याला माजी आमदार पाटील यांनी ‘मी एकटा आपण सांगाल तिथे येतो. मी तर सोडा माझा पाचवी, सहावीचा छोटा नातूही मोहोळ असू द्या नरखेड असू द्या, तिथे जाईल,’ असे त्यांचे चॅलेंज मोडीत काढले.

माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटलांना चॅलेंज दिले होते. त्यांनी अनगर गट सोडून कोणत्याही गटातून निवडणूक लढवावी. पराभूत झालो तर मी राजकारण सोडेन, असे त्यांनी म्हटले होते.

उमेश पाटील (Umesh Patil) यांनी दिलेल्या आव्हानाला माजी आमदार राजन पाटील यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, आम्हाला काही राजकारण सोडायचं नाही. आम्ही कोणाशी स्पर्धाही करत नाही. मी जिल्हा कुस्तीगीर संघाचा उपाध्यक्ष होतो, त्यामुळे मला माहिती आहे की कुस्ती कुणाशी खेळावी. पहिलवान कसा असावा, याचे ज्ञान मला आहे, त्यांना आहे की नाही माहिती नाही. त्यामुळे अशा लोकांबद्दल बोलणं म्हणजे आमची उंची कमी होईल.

उमेश पाटील यांनी अनगरमध्ये हल्ला झाल्याचा आरोप केला होता. त्यावर राजन पाटील म्हणाले, मी खूप लहान व्यक्ती आहे. पण माझं आडनाव गुंड आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आव्हान देण्याइतपत आम्ही मोठे नाही. मात्र मी एकटा मुंबई, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्थानात आपण सांगाल तिथे येतो. मीच काय तर सोडा माझा पाचवी सहावीचा छोटा नातू तिथे जाईल. मोहोळ असू द्या नरखेड असू द्या सगळं आपलच गाव आहे.

Rajan Patil-Umesh Patil
Mahayuti Politics : महायुतीत पहिला मिठाचा खडा पडला ! शिंदेंच्या आमदाराने घोषणा केली, मग भाजपच्या नेत्यालाही राहवलं नाही..

यशवंत माने हे माजी आमदार आहेत, ते निष्ठावंत आहेत तेसुद्धा आमच्या सोबत आहेत, असा दावा माजी आमदार राजन पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले, मी कधीही कोणाला पद मागितलेली नाहीत. आम्ही सत्तेसाठी काम करत नाही, आमच्या बाप जाद्याचा वारसा आहे. आम्ही कोणाला काही मागायला गेलो नाही.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काय चुकतंय, हे सांगण्याइतपत मी मोठा नाही. आपण याबाबत त्यांनाच विचारावे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीच्या निर्णयाबाबत जादा बोलण्यास नकार दिला.

Rajan Patil-Umesh Patil
Mumbai mega morcha : निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार; विरोधी पक्षांचा प्रमुख नेत्यांसह 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा

Q1: उमेश पाटील यांनी राजन पाटील यांना कोणते आव्हान दिले?
A1: अनगर सोडून कोणत्याही गटातून निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले.

Q2: राजन पाटील यांनी त्या आव्हानाला काय उत्तर दिले?
A2: त्यांनी आव्हान हसण्यास्पद ठरवून “मी आणि माझा नातू सुद्धा तिथे जाऊ” असे म्हटले.

Q3: दोघांमधील वादाचे कारण काय आहे?
A3: राजन पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय मतभेद वाढले.

Q4: राजन पाटील यांनी अजित पवारांविषयी काय सांगितले?
A4: “उपमुख्यमंत्री अजित पवार काय करतात हे सांगण्याइतका मी मोठा नाही,” असे त्यांनी नम्रपणे उत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com