Mahayuti Politics : महायुतीत पहिला मिठाचा खडा पडला ! शिंदेंच्या आमदाराने घोषणा केली, मग भाजपच्या नेत्यालाही राहवलं नाही..

Mangesh Chavan On Kishor Patil : शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं. त्याला भाजप आमदाराने उत्तर दिल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला.
Devendra Fadnavis-Eknath Shinde On Local Body Election 2025 News
Devendra Fadnavis-Eknath Shinde On Local Body Election 2025 NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : जळगावच्या पाचोरा, भडगाव मतदारसंघातून शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांनी जाहीरपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानंतर भाजप आमदारानेही त्याला उत्तर म्हणून स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघात कोणाशीही युती न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर भाजपलाही स्वबळावर लढावेच लागेल असं चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने भाजपच्या वतीने मंगेश चव्हाण यांनीही लगेच आढावा बैठक घेत त्यांची भूमिका जाहीर केली.

मंगेश चव्हाण म्हणाले, भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हीही एकटे लढणार आहोत. किशोर पाटील यांच्या भूमिकेला मंगेश चव्हाण यांनी दिलेलं हे उत्तर पाहाता त्यामुळे निवडणुका घोषित होण्यापूर्वीच पाचोरा मतदारसंघात युती फिसकटल्याचं दिसत आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde On Local Body Election 2025 News
Gulabrao Patil : गुलाबरावांनी मन मोकळं केलं, म्हणाले, आयुष प्रसाद हे एकदिवस महाराष्ट्राचे मुख्य सचिव होतील

आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, की गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांना आम्ही सर्वार्थाने सहकार्य केले. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या सांगण्यानुसार मी स्वतः ज्युनिअर असतानाही उपस्थित राहिलो. अनेकांना फोन करून सहकार्याची विनंती केली. तरीही मी विरोधात भूमिका घेतल्याचे त्यांनी म्हटले, तर त्याचे स्पष्टीकरण त्यांनीच द्यावे.

मंगेश चव्हाण पुढे म्हणाले, एखाद्या व्यक्तीने मतभेद व्यक्त केले म्हणजे संपूर्ण पक्ष विरोधात आहे, असा अर्थ होत नाही. राजकारणात कोणी कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा असतो, महत्त्वाकांक्षा असतात. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी टोकाचे बोलू नये. काही गोष्टी सांभाळून बोलल्या तर बरं होईल. स्थानिक युती संदर्भातील निर्णय पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन घेतील असे आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis-Eknath Shinde On Local Body Election 2025 News
Congress Protest : महायुती सरकारचा धिक्कार करणार ; कॉंग्रेस नेते खाणार शेतकऱ्यांसोबत 'पिठलं भाकरी' अन् ठेचा..

किशोर पाटील यांच्या विषयी पक्षाने व गिरीश महाजन यांनी जे जे सांगितले मी ती भूमिका पार पाडली. एखाद्या व्यक्तीची बंडखोरी म्हणजे पक्षाची बंडखोरी नाही. भाजपच्या 20 कार्यकर्त्यांपैकी 17 कार्यकर्त्यांनी किशोर पाटलांचे काम केले आहे. किशोर पाटील यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. त्याला आपण काय करु शकणार नाही. आमच्याकडून कधीही सर्वांसाठी युतीचे मार्ग खुले असतात. किशोर पाटील यांनी काही प्रस्ताव दिला तर पुन्हा त्यावर चर्चा होऊ शकते असेही मंगेश चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com