Solapur Dcc Bank Result : कल्याणशेट्टी समर्थक राजेंद्र बंदीछोडेंचा निसटता विजय; गणपतआबांचे दुसरे नातू अनिकेत देशमुखांची कडवी लढत

Rajendra Bandichode's Victory : सोलापूर डीसीसी बँकेच्या विजाभज मतदारसंघातून सचिन कल्याणशेट्टी समर्थक राजेंद्र बंदीछोडे विजयी झाले. मोहिते पाटील पॅनेलचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी त्यांना शेवटपर्यंत कडवी लढत दिली.
Dr aniket deshmukh-Rajendra Bandichode
Dr aniket deshmukh-Rajendra BandichodeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 27 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक निकालात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कट्टर समर्थक राजेंद्र बंदीछोडे हे विमुक्त जाती-भटक्या जमाती या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, सत्तेचे संपूर्ण पाठबळ असूनही मोहिते पाटील प्रणित पॅनेलचे डॉ अनिकेत देशमुख यांनी कल्याणशेट्टी समर्थक बंदीछोडे यांना शेवटपर्यंत कडवी लढत दिली. पण, अक्कलकोटने तारल्यामुळे बंदिछोडे यांचा विजय झाला असून (स्व.) गणपराव देशमुख यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एकूण १९ जागांपैकी १० जागा भाजपप्रणित पॅनेलच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरीत ९ जागांसाठी गुरुवारी (ता. २६ नोव्हेंबर) मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज सकाळ आठपासून सुरू आहे.

जिल्हा बॅंकेच्या आरक्षित असलेल्या विमुक्त जाती-भटक्या जमाती या मतदारसंघातून डॉ. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कट्टर समर्थक राजेंद्र बंदीछोडे यांना आव्हान दिले होते. बंदीछोडे यांच्या पाठीशी सत्तेची संपूर्ण ताकद होती.

Dr aniket deshmukh-Rajendra Bandichode
Solapur Dcc Bank Result : गणपतराव देशमुखांच्या नातवाची जिल्हा बॅंकेत एन्ट्री; आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचा सांगोल्यातून विजय

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह संपूर्ण भाजप बंदीछोडे यांच्यासाठी प्रयत्न करत होते. तरीही त्यांना १४७ मतांनीच विजय मिळविता आला आहे. बंदीछोडे यांना १२७६ मते मिळाली आहेत, तर डॉ. अनिकेत देशमुख यांना ११२९ मते मिळाली आहेत.

Dr aniket deshmukh-Rajendra Bandichode
Solapur Dcc Bank Result : सोलापूर डीसीसीचा पहिला निकाल मोहिते पाटलांच्या बाजूने; माळशिरसमधून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी

सत्ता नसतानाही अवघ्या काही दिवसांच्या तयारीने डॉ. अनिकेत देशमुख यांनी ११२९ मते घेत कल्याणशेट्टी समर्थक बंदीछोडे यांना कडवी लढत दिली आहे. सत्तेच्या पाठबळामुळे आणि अनेक बडे नेते विरोधात असूनही डॉ. देशमुख यांनी बंदीछोडे यांना शेवटपर्यंत घायकुतीला आणले होते. मात्र, बंदीछोडे यांना अक्कलकोट सोसायटी मतदारसंघाने तारल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Dr. Babasaheb Deshmukh
Subhash Deshmukh-Amol Shinde
Dr. Babasaheb Deshmukh – Sanjay Ingole
Dr. Babasaheb Deshmukh- Ganpatrao Deshmukh-Dr. Aniket Deshmukh