Shivsena News : विनायक राऊतांवर क्षीरसागरांचा हल्लाबोल; म्हणाले, 'त्यांची लायकी काय मला माहिती...'

Political News: कोल्हापुरात आलेले शिवसेना ठाकरे गटाचे सचिव त्यांच्या मतदारसंघात अडीच वर्षांपूर्वी जाऊन सांगितलं होते की, हे पुढचे खासदार नाहीत. ठाकरे गटाचे सचिव त्यांची लायकी काय आहे. हे मला माहिती आहे.
Rajesh Kshirsagar
Rajesh KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोल्हापुरात आलेले शिवसेना ठाकरे गटाचे सचिव त्यांच्या मतदारसंघात अडीच वर्षांपूर्वी जाऊन सांगितलं होते की, हे पुढचे खासदार नाहीत. ठाकरे गटाचे सचिव त्यांची लायकी काय आहे. हे मला माहिती आहे.

अशा मंडळीनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कान भरून पक्ष संपवला, असा हल्लाबोल राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊतांवर केला. कोल्हापुरातील कळंबा येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यानंतर त्यांनीही टीका केली. (Shivsena News)

दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा टोला शिंदे गटाला लावण्यात आला होता. या सोहळ्याकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवल्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मोठे मोठे नेते, शिवसेनेसाठी अंगावर गुन्हे घेतलेले कार्यकर्ते पक्ष सोडून का जातात? याचा विचार तुम्ही केला पाहिजे? दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी 50 कार्यकर्ते देखील नव्हते, यांची लायकी दाखवली. यांची दखल कोणीच घेतली नाही. त्यामुळे यांचा चेहरा उघड झाला आहे.

Rajesh Kshirsagar
Jayant Patil News : जयंत पाटलांचे मोठं विधान; म्हणाले, 'चंदगडमध्ये नवा चेहरा...'

10,000 आणि 5,000 ची पाकीट मारी करून आंदोलन करणारे हे नेते आहेत. यांना मतदान कोण देणार आहे? माझ्या विरोधात उमेदवार कोणीही येऊ दे? शिवसेनेचा धनुष्यबाण त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.

Rajesh Kshirsagar
Amol Kolhe News : लक्षात ठेवा वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच; अमोल कोल्हेंनी दिला इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com