Rajesh Kshirasagar on Hasan Mushrif : मुश्रीफांच्या सहकारातील भूमिकेवर क्षीरसागरांनी नाराजी व्यक्त करत दिला 'हा' इशारा, म्हणाले ...

Rajesh Kshirasagar angry on Hasan Mushrif News : सहकाराच्या नावाखाली सुरू असलेला मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा दोस्ताना अनेकांच्या डोळ्यात आल्याचे दिसत आहे.
Rajesh Kshirasagar on Hasan Mushrif
Rajesh Kshirasagar on Hasan Mushrifsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : कोल्हापूरचे माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यस्तरावरील राजकारणात महायुतीसोबत तर सहकारासोबत महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत बस्तान बांधले आहे. राज्यात एक आणि कोल्हापुरात एक अशी भूमिका महायुतीच्या नेत्यांना पटलेली नाही. सहकाराच्या नावाखाली सुरू असलेला मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा दोस्ताना अनेकांच्या डोळ्यात आल्याचे दिसत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता महाडिक गटाचे लक्ष 'गोकुळ'वर आहे.

महाडिक गटाकडून मिशन गोकुळ या नावाखाली अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यावर मुशरिफ यांनी आपण सहकारात एकत्रच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण महायुती सोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता त्यावरून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर(Rajesh Kshirasagar) यांनी खडेबोल सुनावले आहेत.

राजेश क्षीरसागर यांनी सहकारात सोयीची भूमिका घेणाऱ्या इशारा दिला आहे. सहकारात महायुती का चालणार नाही?. तेथे सोयीची भूमिका कशी चालेल? असा सवाल राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे. गरज भासल्यास याबाबत पक्षश्रेष्ठींना लक्ष घालावे लागेल, असाही इशारा दिला आहे.

Rajesh Kshirasagar on Hasan Mushrif
Bhai Jagtap on Election Commission : काँग्रेस आमदार भाई जगताप यांचं निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

आमदार हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी शुक्रवारी जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघात महायुती चालणार नसल्याचे संकेत दिले. या संकेतासोबत महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या सोबतचा दोस्ताना कायम ठेवला आहे. त्यावर त्यांच्या शिवसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

Rajesh Kshirasagar on Hasan Mushrif
Sillod Assembly Election : निवडून आल्यानंतरही सत्तारांची साडेसाती संपेना; सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल

महायुतीचा फॉर्म्युला दिल्लीपासून गल्लीपर्यंत चालला आहे. राज्यातील विधानसभा सुद्धा एक दोन नव्हे तर तीन चार पक्ष एकत्र येऊन झाल्यात. जिल्ह्यात देखील 100 टक्के महायुतीला यश मिळाले आहे. मात्र तरीही मुश्रीफ यांनी स्वतंत्र भूमिका जाहीर केली याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

इतर नेत्यांसाठी कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ ह्या महत्वाच्या संस्था आहेत. त्या जिल्ह्यातील आर्थिक आणि राजकीय नाडे आहेत. तिथेही युती होऊ दे आणि महायुती येऊ दे. सर्व पक्षांची सत्ता होऊ दे. प्रत्येक नेत्याला असंच वाटतं की या ठिकाणी हे आपली सत्ता यावी. अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) यांनी देखील दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com