Rajmata Kalpanaraje Bhosale : राजघराण्यातील असूनही राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे हृदय संवेदनशिल आहे. आपला डामडौल बाजूला सारून त्या सर्वांना मदत करत असतात. केवळ माणसांवरच नाही तर त्या प्राणिमात्रावरही दया दाखवतात. रस्त्यात थंडीने कुडकुडणाऱ्या कुत्र्याच्या पिलाच्या अवस्थेने त्यांचे हृदय पिळवटून गेले. अन् राजमातांनी त्या पिलाला चक्क आपल्या गाडीत घेऊन त्याच्या आयुष्याची भाकरी दिली...
राजमाता कल्पनाराजे भोसले या संगमनेरमार्गे विमानतळ रस्त्याने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात होत्या. यावेळी त्यांनी रस्त्यावर कुत्र्याचे लहान पिलु थंडीने कुडकुडत असल्याचे पाहिले. तातडीने त्यांनी चालकाला वाहन थांबवण्यास सांगितले. स्वत: उतरुन त्यांनी त्या पिलाला उचलून घेतले तसेच मांडीवर घेत त्याला शिर्डीच्या शासकिय विश्रामगृहात घेऊन आल्या.
पहाटेचे दोन वाजले होते. या पिलासाठी त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या सेवकांना दुधाची पिशवी आणायला लावली. दूध गरम करुन त्याला पिण्यासाठी द्यायला सांगून दूधात पाणी टाका थेट दूध देऊ नका, नाहीतर त्या दुधाने त्याला उलटी होईल, असे सांगितले. तसेच पिलाला थंडी वाजू नये म्हणून त्यांनी खोलीत सुरु असलेला पंखाही बंद केला. पिलू झोपल्यानंतरच त्या झोपी गेल्या.
शिर्डीतून सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन निघताना त्यांनी कुत्र्यांचे पिलू कुठे आहे, असे विचारुन त्याला सोबत घ्यायला लावले. तेथून त्याला गाडीत घेउन जाताना सर्वजण नारायणगाव नजीकच्या हरी पांडूरंग या हॉटेलवर जेवण्यासाठी थांबले. त्या कुत्र्यालाही खाली आणले. हे पाहून हॉटेलचे मालक कुंदन शिंदे यांनी याला संभाळण्यासाठी माझ्याकडे द्या, अशी विनंती केली.
त्यावेळी नीट संभाळणार का ? त्याला भाकरी घालू नका, रोज अंघोळ घाला. घरातच ठेवा अशा सूचना राजमाता कल्पनाराजे यांनी श्री. शिंदेंना दिल्या. मी पुन्हा आपल्यानंतर मला ते दिसले पाहिजे, असे सुनावलेही. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा या कुत्र्याची चौकशी राजमातांनी केली. पिल्लू व्यवस्थित आहे का, त्याला अंघोळ घातली का, डॉक्टरकडे नेले का, अशी विचारणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्यांनी श्री. शिंदे यांना फोन करुन कुत्र्यांची माहिती घेतली. त्यावर राजमातांनी दिलेल्या कुत्र्याची मी मुलाप्रमाणे काळजी घेत आहे. त्याचे नामकरण वाघ्या असे केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.