
Raju Shetti: सततचा दुष्काळ, कमी पाऊसमान आणि आता मुसळधार पाऊस अशा अनेकविध कारणांमुळं शेती भरवशाची राहिलेली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मुलांची आता लग्नही जमेनाशी झाली आहेत. याच गंभीर प्रश्नावर भाष्य करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांना एक उपाय सुचवला आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या मुली या शेतकऱ्याच्या मुलांनाच दिल्या पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.
शेट्टी म्हणाले, "शेती भरवशाची नाही, पावसामुळं शेतीचं नुकसान होत आहे. शेतीत फायदा नाही, शेतकरी आत्महत्या करत आहे म्हणून शेतकऱ्याला मुली कोणी देत नाही. शेतकऱ्याच्या मुलांची लग्ने होत नाहीत. प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या मुली या शेतकऱ्याच्या मुलालाच दिल्या पाहिजेत असा ठराव करण्याची वेळ आली आहे"
दरम्यान, ऊसाचा काटा मारणारे मी शोधलेत आता त्यांना मी आता दाखवतो, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच दिला होता. त्यांच्या या विधानावर राजू शेट्टींनी आज सडकून टीका केली. शेट्टी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मी 10 वर्षांपूर्वी काटा कसा मारतात? हे सांगितले होतं, याचे सर्व पुरावे दिले होते. त्यावेळी कारवाई न करता आता ब्लॅकमेलिंगसाठी त्याचा वापर मुख्यमंत्री करत आहेत.
काटा मारीतून रोज एक कारखाना तयार होतो आहे. अजित पवार दिवसाला 1 लाख टन ऊस गाळतात, त्यामुळं सर्वात जास्त लाभार्थी तेच आहेत. सगळे कारखानदार आता AI चा वापर करा असं म्हणू लागले आहेत. पण यासाठी ऊस कुठून आणणार? असा सवालही यावेळी राजू शेट्टींनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.