Mumbai News, 20 Mar : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून (Disha Salian death case) पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं आहे. कारण दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केल्यामुळे आता हे प्रकरण नव्याने चर्चेत आलं आहे. त्यांनी या याचिकेत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
दिशावर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. तर या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासह काही अभिनेत्यांची नावाच उल्लेख देखील करण्यात आला आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांकडून हे एक षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापलेलं असतानाच आता या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे.
तो म्हणजे, सामूहिक बलात्कार, खून आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली आरोपीवर गुन्हे दाखल करावे. उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत हा तपास 'CBI', 'NIA'कडे सोपवावा. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार, पत्रकार आणि समीर वानखेडे यांना पोलिस संरक्षण द्यावे आणि सर्व हटवलेल्या फाइल्स, CCTV फुटेज आणि फेरफार केलेला न्याय वैद्यकीय अहवाल परत मागवावा. हे प्रकरण निष्पक्ष चालविण्यासाठी खटला महाराष्ट्राबाहेर हस्तांतरित करा तसेच याचिकेत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना प्रतिवादी करण्याची मागणी दिशाच्या कुटुंबियांनी केली आहे.
दरम्यान, दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत दिशा आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंची चौकशी होणार का? हे पाहावं लागणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.