Loksabha Election 2024 : 'स्वाभिमानी' कार्यकर्त्यांचीच मेळाव्याकडे पाठ; राजू शेट्टींना अतिआत्मविश्वास भोवणार?

Raju Shetty : मेळाव्याला 40 हून अधिक गावांतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पाठ
Raju Shetty
Raju ShettySarkarnama

Kolhapur Political News :

आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 'एकला चलो'चा नारा दिला आहे. महाविकास आघाडीकडून वारंवार राजू शेट्टींना 'इंडिया' आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच आता माजी खासदार राजू शेट्टींच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिरोळ आणि हातकणंगलेतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा झाला. त्यात हे चित्र उघड झाले. (Loksabha Election 2024)

Raju Shetty
Sharad Pawar : 'परिवर्तनाची सुरुवात कोल्हापूरच करेल...'; शरद पवारांनी सांगितली वैशिष्ट्ये

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याला (Swabhimani Shetkari Sanghatana) हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील बहुतांश गावांतील कार्यकर्ते उपस्थित नव्हते. दोन्ही तालुक्यांतील सुमारे 40 हून अधिक गावांतील कार्यकर्त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. संघटनेशी एकनिष्ठ राहिलेल्या अनेक कार्यकर्त्यांना मेळाव्याचा निरोपच मिळाला नसल्याने तेही नाराज झाल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे राजू शेट्टी (Raju Shetty) फारसे समाधानी दिसत नव्हते.

दरम्यान, या मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. लोकसभेची निवडणूक तुम्हा आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. भांडवलशाही विरोधात लोकशाही, अशी ही लढाई असून, लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर कार्यकर्त्यांनी डोळ्यांत तेल घालून निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, अशी भावना व्यक्त करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी रणशिंग फुंकले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील वेळेस आपणच अतिआत्मविश्वासानेच आपला घात केला. मागील चुका पुन्हा करून चालणार नाहीत. यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून जबाबदारी ठामपणे पार पाडावी, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. तसेच केलेल्या कामाची माहिती मतदारापर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे आहे, संघटनेपासून जे दुरावले आहेत त्यांनाही पुन्हा प्रवाहात आणावे, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले सांगितले.

(Edited by Avinash Chandane)

R

Raju Shetty
Sharad Pawar At Kolhapur : महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं; कोल्हापुरच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com