Sharad Pawar At Kolhapur : महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं; कोल्हापूरच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम..!

Sharad Pawar On NCP Party : आगामी लोकसभा निवडणुकीच्या कोल्हापूर जागेच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarakrnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi meeting : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. ही जागा काँग्रेसकडे येणार की ठाकरे गटाला जाणार, याबाबत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसकडून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, तर ठाकरे गटाकडून गोकुळचे संचालक चेतन नरके यांचे नाव आघाडीवर आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दौऱ्यावर आल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांसोबत आमदार सतेज पाटील यांच्या घरी डिनर डिप्लोमसी करत आगामी लोकसभा निवडणुकीच्या कोल्हापूर जागेच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली. Sharad Pawar On NCP Party 

आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार यांच्यासह श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भाकपचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा, राष्ट्रीय सचिव भालंचद्र कांगो, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार हे स्नेहभोजनाला उपस्थित होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी पवार यांनी चर्चा केली.

लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या टप्प्यात न घेता एकाच टप्प्यात घेऊ शकतात. त्यामुळे आपण सतर्क आणि तयारीत असले पाहिजे,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलताना व्यक्त केले. देशात आणि महाराष्ट्रात भाजपसह महायुती सरकारच्या मनमानीला लोक कंटाळले आहेत. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील विद्यमान खासदारांच्या कामाबद्दल लोक जाहीररीत्या नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे लोकांना चांगला आणि महाविकास आघाडीचाच पर्याय हवा आहे. याबद्दल पक्षश्रेष्ठींनी विचार केला पाहिजे,’ असे आवाहन जिल्ह्यातील नेत्यांनी केले. दरम्यान, काहींनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नावाबद्दलही सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते.Sharad Pawar At Kolhapur

Sharad Pawar
Sharad Pawar : अजित पवारांचे पुतणे तुमच्याबरोबर आले तर स्वागत करणार का? शरद पवार म्हणाले, "कुणी..."

पवार यांनीही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कोणकोणत्या उमेदवाराचा विचार होऊ शकतो, त्याबद्दल बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे, या सर्वांचा आढावा घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर पवारसाहेबांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि बाळासाहेब थोरात (Balasaeb Thorat) यांच्यासोबत व्यक्तिगत वीस मिनिटे चर्चा केली. यामध्ये त्यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी कोणाबद्दल लोक सकारात्मक राहतील, याची चर्चा केल्याचे समजते.

देशात आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वसामान्य लोकांची मोठी पसंती आहे. जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) (Ajit Pawar) आणि शिवसेनेसह (शिंदे गट) (Eknath Shinde) कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील विद्यमान खासदारांबद्दल मोठी नाराजी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून देईल तो उमेदवार निश्‍चितपणे विजयी होईल,’ अशी माहिती जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना आज दिली.

Edited By : Rashmi Mane

R

Sharad Pawar
Sharad Pawar : 'परिवर्तनाची सुरुवात कोल्हापूरच करेल...'; शरद पवारांनी सांगितली वैशिष्ट्ये

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com