Solapur Loksabha constituency : सोलापूरसाठी भाजपकडून राम सातपुते फायनल; दोन युवा आमदारांमध्ये होणार लढत

Loksabha Election 2024 : कागदावर जरी महायुती बलाढ्य वाटत असली तरी प्रत्यक्षात ‘ग्राउंड लेव्हल’वर परिस्थिती काहींशी वेगळी आहे, त्यामुळे सोलापूर मतदारसंघात दोन्ही युवा आमदारांमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.
Praniti Shinde-Ram Satpute
Praniti Shinde-Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 March : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नाव निश्चित झाले असून, पक्षाच्या पुढील यादीत त्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. अनेक नावांचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी निवडून येण्याच्या निकषावर आमदार सातपुते यांचे नाव फायनल केल्याची माहिती आहे.

काँग्रेसकडून सोलापूरसाठी आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचे नाव गुरुवारी रात्री जाहीर झाले आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्याविरोधात कोण असणार, याची उत्सुकता सोलापूरमध्ये असतानाच आमदार सातपुते (Ram Satpute) यांचे नाव भाजपकडून फायनल करण्यात आल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच राम सातपुते यांच्याशी चर्चा करून त्यांना सोलापूरच्या (Solapur) रणांगणात उतरण्यासाठी राजी केल्याचे सांगण्यात येत आहे.

Praniti Shinde-Ram Satpute
Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या कारवर भाजप समर्थकांकडून हल्ला? सरकोली गावात...

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार अमर साबळे, शरद बनसोडे, पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्यापासून स्थानिक माजी नगरसेवकांपर्यंत अनेक नावांची चर्चा झाली. मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी टक्कर देणारा उमेदवार म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून राम सातपुते यांचे नाव आघाडीवर होते.

आमदार सातपुते हे सोलापूर लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते. तसे त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातले होते. त्यामुळे गेली काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राम सातपुते यांची उमेदवारी घोषित होऊ शकली नव्हती. मात्र, पक्षाचा ‘चारशे पार’ चा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपला एकेक जागा महत्त्वाची आहे, त्यातून आमदार सातपुते यांची उमेदवारी पुढे आली आहे.

Praniti Shinde-Ram Satpute
SanjeevRaje Naik Nimbalkar : माढ्याच्या रणांगणात फलटणचे राजे वाजविणार तुतारी?

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. अवघ्या एका मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे, त्यामुळे कागदावर जरी महायुती बलाढ्य वाटत असली तरी प्रत्यक्षात ‘ग्राउंड लेव्हल’वर परिस्थिती काहींशी वेगळी आहे, त्यामुळे सोलापूर मतदारसंघात दोन्ही युवा आमदारांमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

R

Praniti Shinde-Ram Satpute
Mohite Patil News : माढ्याबाबत मोठी अपडेट; धैर्यशील मोहिते पाटील पवारांना बारामतीत जाऊन भेटणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com