Ramdas Athawale : महायुतीत रामदास आठवलेंची दावेदारी, स्थानिक चेहरा नसल्याने वाली कोण? कोल्हापूरात आरपीआयची कोंडी!

Ramdas Athawale Kolhapur : रामदास आठवलेंनी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 10 जागांची मागणी केली आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी रणसिंग फुंकले आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीनंतर आता महायुतीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)नेही जागांसाठी दावेदारी केली आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका व जिल्हा परिषदेत आरपीआयला जागा देण्याची मागणी केली आहे.

आठवले यांनी स्पष्ट केले की, महापालिकेत पाच, जिल्हा परिषदेत तीन आणि पंचायत समितीत ८ ते १० जागा रिपब्लिकन पार्टीला मिळाव्यात. याबाबत त्यांनी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले.

शहर आणि जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाची सद्यस्थिती पाहता पदाधिकारी केवळ नेत्यांच्या दौऱ्यांपुरतेच एकत्र येतात. प्रत्येक मतदारसंघात थोडी ताकद असली तरी पुरोगामी विचारसरणीमुळे मतदारवर्ग विखुरलेला आहे. त्यामुळे इतर पक्षातील नेते केवळ नावापुरतीच दखल घेतात, असे चित्र आहे. जिल्हा आणि शहरातील पदाधिकारी आंदोलनात सक्रिय असले तरी जनमानसात ठोस प्रतिमा निर्माण करण्यात पक्षाला अपयश आले आहे.

दरम्यान, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून तीव्र दावेदारी सुरू असल्याने रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडून अपेक्षित न्याय मिळणे कठीण दिसते. याशिवाय जिल्हा पातळीवर पक्षाकडे प्रभावी नेतृत्वाचा अभाव असल्याचेही स्पष्ट होत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जागांचा दावा केला असला तरी त्याला पाठिंबा देणारा मजबूत स्थानिक चेहरा पक्षात नसल्याची चर्चा आहे.

Ramdas Athawale
Maratha Reservation: 'हैदराबाद गॅझेट'ची अंमलबजावणी सुरु असतानाच मराठा समाजातील 70 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

आठवले यांची भूमिका

भाजपचे आम्ही जुने सहकारी आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार आहोत. महायुतीच्या उमेदवारांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल. मात्र रिपब्लिकन पक्षालाही न्याय मिळालाच पाहिजे,” असे आठवले म्हणाले.

महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीला रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलावले जाणार असून त्यावेळी त्यांनी आपली यादी सादर करावी, असे महाडिक व क्षीरसागर यांनी सांगितल्याची माहिती आठवले यांनी दिली.

स्थानिक परिस्थिती

कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार लक्षणीय असले तरी मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये हा मतदारवर्ग विभागला गेला. पुरोगामी विचारसरणीशी जोडलेला हा मतदार काँग्रेससोबत राहिल्याने आरपीआयला अपेक्षित ताकद दाखवता आली नाही. मात्र, आठवले यांच्या दाव्यामुळे महायुतीच्या जागावाटपात आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

Ramdas Athawale
Manorama Khedkar: मनोरमा खेडकरांवर पुण्यात गुन्हा दाखल! अपहरण प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com