Jayant Patil Offer: राजीनाम्यानंतर काही वेळातच जयंत पाटलांना केंद्रातून मोठी ऑफर; म्हणाले, 'जर त्यांना मार्ग बदलायचा असेल, तर...'

NCP Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. दरम्यान, त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचंही वृत्त माध्यमांमध्ये झळकल्यानं खळबळ उडाली होती.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आहे. त्यांच्या जागी विधान परिषेदेचे आमदार व सातारा जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जयंत पाटील (Jayant Patil) शरद पवारांची साथ सोडणार का,अशी चर्चा सुरू झाली आहे.अशातच केंद्रीय मंत्र्यांनी पाटलांना मोठी ऑफर दिली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंगळवारी(ता.15) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी वाळवा येथे मीडियाशी संवाद साधला. त्यांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. तसेच त्यांना थेट महायुतीत येण्याची ऑफरही दिली.

मंत्री रामदास आठवले म्हणाले, जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुतीसोबत आलं पाहिजे. मी मध्यस्थी करुन त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणायला तयार असल्याचं आठवले म्हणाले.

जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिला असेल तर आणि त्यांना विकास करायचा असेल तर सत्येसोबत यायला हवं, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला. राष्ट्रवादी सोडणार असाल, तर मी मध्यस्थी करुन त्यांना महायुतीत, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणायला तयार असल्याचं विधान रामदास आठवले (Ramdas Athawale)यांनी केलं आहे.

Jayant Patil
Chandrapur Bank: चंद्रपूर बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; भाजपनं ठाकरेंचा 'सेनापती'च पळवला; अध्यक्षाची निवड होण्याआधीच डाव टाकला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. दरम्यान, त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचंही वृत्त माध्यमांमध्ये झळकल्यानं खळबळ उडाली होती. पण आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनीही जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नसल्याचं स्पष्टीकरण दिले.

यानंतर जयंत पाटील यांनीही सोमवारी (ता.14) पत्रकार परिषदेत आपण अद्याप अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच भाजप असो किंवा इतर कोणताही राजकीय पक्ष त्याच्याशी किंवा त्यांनी माझ्याशी प्रवेशासाठी संपर्क केलेला नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनी मंगळवारी (ता.15) पक्षाची सर्वसाधारण बैठक होणार असून या गोष्टींची येथे चर्चा होणार असून त्यानंतर सगळ्या गोष्टी क्लेअर होतील असंही म्हटलं होतं.

Jayant Patil
Jayant Patil: जयंत पाटील यांचा अखेर राजीनामा; शरद पवारांनी हुकमी पत्ता बाहेर काढला; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही महाराष्ट्रात पालिका आणि जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात बदल होणार असल्याचे संकेत दिले जात होते. अखेर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर पवारांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली आहे.

यानंतर जयंत पाटील यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेनेसह त्यांना भाजपकडून ऑफर आल्याचे समोर आले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना थेट ऑफर देताना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न करू असं म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर जयंत पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पक्षात येण्याची ऑफर दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com