Chandrapur Bank: चंद्रपूर बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; भाजपनं ठाकरेंचा 'सेनापती'च पळवला; अध्यक्षाची निवड होण्याआधीच डाव टाकला

BJP Political News: चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षाची निवड व्हायच्या आधीच काँग्रेस-महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बँकेवर महायुतीचा अध्यक्ष विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Chandrapur District Bank .jpg
Chandrapur District Bank .jpgSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News: चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षाची निवड व्हायच्या आधीच काँग्रेस-महायुतीला मोठा धक्का बसला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच बँकेचे नव्याने निवडून आलेले संचालक रवींद्र शिंदे यांनी आज भाजपात प्रवेश केला. ही घडामोड बघता भाजप महायुतीने आपला अध्यक्षपदाचा उमेदवार निवडला असल्याचे बोलले जात आहे.

रवींद्र शिंदे हे बँकेचे यापूर्वी एक वर्षांसाठी अध्यक्ष होते. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 संचालक निवडून आले आहेत. महायुती तसेच काँग्रेस आघाडीच्यावतीने आपलेच सर्वाधिक संचालक निवडून आले असून अध्यक्ष आमचाच राहील असा दावा केला आहे. मात्र महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सेनेच्या जिल्हाध्यक्षाने भाजप प्रवेश केल्याने आघाडीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला असल्याचे मानले जाते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या प्रवेश समारंभाला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, आमदार बंटी भांगडिया, करण देवतळे प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बंटी भांगडिया यांची मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वीच अनेकांना महायुतीत खेचून आणले.

चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर या बिनविरोध निवडून आल्या. यात सर्व वाटाघाटी आमदार भांगडिया यांनी केल्याचे बोलले जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी निवडणुकीतून आधीच माघार घेतली होती.

Chandrapur District Bank .jpg
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी हगवणे कुटुंबाची 'उलटी गिनती' सुरू; पुणे पोलिस 'अ‍ॅक्शन मोड'वर

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक (Chandrapur District Bank Election) जिंकण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आपसातील मतभेद विसरून एकत्र आले होते. आम्ही सर्व एकत्र आहो असा संदेशही त्यांनी निवडणुकीपूर्वी बैठक घेऊन सर्वांना दिला होता. मात्र, काँग्रेसचे नेते आपल्या स्वार्थासाठी एकत्र आले होते, आपल्यासोबत दगाफटका केला असा आरोप चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष सूर्यकांत खणके यांनी केला आहे. त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे

चंद्रपूर जिल्हा बँकेची निवडणुकीत भाजप समर्थक पॅनेलचे सर्वाधिक ९ सदस्य निवडून आले आहेत. दुसरीकडे काँग्रेस समर्थक पॅनलनेही आमचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असल्याचा दावा केला आहे. बँकेचा अध्यक्ष आमचाच राहील असेही दावे प्रतिदावे युती व महाविकास आघाडीमार्फत केले जात आहे.

Chandrapur District Bank .jpg
Jayant Patil: जयंत पाटील यांचा अखेर राजीनामा; शरद पवारांनी हुकमी पत्ता बाहेर काढला; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

या निवडणुकीत विजय वडेट्टीवार, भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष धोटे यांचे भाऊ आणि बँकेचे माजी अध्यक्ष यांनीही शेवटच्या क्षणी आपला अर्ज मागे घेतला होता. काँग्रेसने हा आमच्या रणनीतीचा भाग होता असा दावा केला होता.

वैयक्तिक विजयापेक्षा पक्षाला आमचे अधिक महत्त्व असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सेवा दलाचे अध्यक्ष यांचे आरोप आणि राजीनाम्यामुळे काँग्रेसचे सर्व दावे फोल होते हे आता स्पष्ट झाले आहे. आता रवींद्र शिंदेही त्यांच्या हातून गेले आहे. हे बघता चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेवर महायुतीचा अध्यक्ष विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com