Phaltan Politic's : रामराजेंनी अखेर डाव टाकलाच : शिवरूपराजे खर्डेकरांची सातारा DCCतील एन्ट्री रोखण्यासाठी निंबाळकरांची तिरकी चाल...

Ramraje Naik Nimbalkar Vs Shivruparaje Khardekar : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्या दुहेरी उमेदवारीमुळे शिवरूपराजे खर्डेकर यांच्या उमेदवारीबाबत राजकीय चर्चा रंगली.
Shivrupraje Khardekar-Ramraje Naik Nimbalkar
Shivrupraje Khardekar-Ramraje Naik NimbalkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 29 September : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जोरदार घडामोडी घडत आहेत. महायुती नेत्यांच्या बैठकीनंतर सोमवारी रात्रीही काही नेत्यांच्या गाठीभेटी झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, त्यांनी सहकारी सोसायटी गटाबरोबरच कृषी उत्पादक व प्रक्रिया संस्था मतदारसंघातूनही भरल्याने चर्चेला उधाण आले आहे. विद्यमान संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांची जिल्हा बॅंकेतील एन्ट्री रोखण्यासाठी रामराजेंनी हा डाव टाकल्याचे मानले जात आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोमवारपर्यंत २५ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. पहिल्याच दिवशी खासदार उदयनराजे भोसले, संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह सात जणांनी अर्ज दाखल केले होते.

त्यानंतर सोमवारी तब्बल १६ जणांनी १८ अर्ज दाखल केले आहेत. यात ससोसायटी मतदारसंघातून सहा, महिला राखीवमधून तीन, नागरी बॅंका, पतसंस्था मतदारसंघातून एक, कृषी प्रक्रिया संघातून एक, इतर मागास प्रवर्गातून दोन, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातून दोन तर औद्योगिक व मजूर संस्था मतदारसंघातून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून आणि कृषी उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघातून असे दोन अर्ज भरले आहेत. तसेच, फलटण विकास सोसायटी मतदारसंघातून संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अर्ज भरला आहे. कऱ्हाड सोसायटीतून ॲड. उदयसिंह पाटील, खंडाळा सोसायटीतून शामराव गाढवे, पाटण सोसायटीतून सत्यजित पाटणकर आणि याज्ञसेन पाटणकर यांनी अर्ज भरले आहेत.

Shivrupraje Khardekar-Ramraje Naik Nimbalkar
Satara Dcc Bank Election : हायकमांडचे फर्मान येताच सातारा DCC साठी भाजपचा राष्ट्रवादी-शिवसेनेसोबत युतीचा निर्णय; गोरे, देसाईंच्या गैरहजेरीची चर्चा...

महिला प्रतिनिधी मतदारसंघातून सुरभी भोसले, शशिकला जाधव (देशमुख), प्रमिला कदम यांचे अर्ज आहेत, तर नागरी बॅंका पतसंस्था मतदारसंघातून आमदार मनोज घोरपडे, इतर मागासवर्गीय सदस्यातून शंकर रामचंद्र माळवदे व रज्जाक अब्दुल मुलाणी यांचे, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातून शिवाजीराव शेळके-पाटील व लहुराज गणपती जाधव, तर औद्योगिक, मजूर संस्था मतदारसंघातून विक्रम जयसिंगराव जाधव यांचा अर्ज दाखल झाला आहे. आणखी तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत कृषी उत्पादक व प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डेकर हे जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून निवडून आले होते. खर्डेकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटात सामील झाले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून खर्डेकर हे रामराजेंच्या विरोधात तुटून पडत आहेत. त्यांच्या प्रखर विरोधामुळे फलटणमधील राजकीय संघर्षात वाढ झाली आहे.

Shivrupraje Khardekar-Ramraje Naik Nimbalkar
Yavatmal DCC Bank : जिल्हा बँकेचा ‘बिनविरोध’ प्लॅन अडचणीत : काँग्रेसच्या 4 जागांच्या मागणीने जागावाटपाचा फॉर्म्युला बिघडला!

गेल्या पाच वर्षांपासून फलटणमध्ये होत असलेल्या विरोधाचे उट्टे काढण्यासाठी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोठा डाव टाकल्याचे दिसून येत आहे. खर्डेकर ज्या कृषी उत्पादक व प्रक्रिया संस्था मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्याच मतदासंघातून रामराजेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे खर्डेकरांचा मार्ग खडतर बनण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com